Home Breaking News ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) येथे शिवस्वराज्यदिन मोठ्या उत्साहात साजरा.

ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) येथे शिवस्वराज्यदिन मोठ्या उत्साहात साजरा.

148
0

ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) येथे शिवस्वराज्यदिन मोठ्या उत्साहात साजरा.

छ.शिवाजी महाराज याचे आत्मचरित्र सर्वांनी आत्मसात करावे.. शिवप्रेमी अनिल पाटील वडजे उंद्री   
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज ६ जून २०२१ रोजी सकाळी ठीक ९ :१५ वाजता उंद्री (प.दे.) ता. मुखेड येथील ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात रयतेचे राजे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनी शिवस्वराज्यदिन भगवी गुढी उभारून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी शासनाने दिलेल्या संहितेचा अवलंब केला आहे. भगवा स्वराज्य ध्वज आणि शिवश्क राजदंड स्वराज्य गुढी
उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला,छत्रपती शिवाजी महाराज याचे आत्मचरित्र सर्वांनी आत्मसात करावे आसे प्रतिपादन शिवप्रेमी अनिल पाटील वडजे यांनी व्यक्त केले.यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून शिवस्वराज्य दिन साजरा केला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता.म्हणून हा दिवस शिवराज्यदिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. उंद्री नगरीतील सरपंच श्रीमती वनिता रमेश गनलेवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण केले.तर उपस्थित सर्व मान्यवर व शिवप्रेमींनी पुष्प अर्पण करून मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले.यावेळी गावातील उपसरपंच ग्रामविकास अधिकारी श्री डुमणे सर युवक काँग्रेसचे महासचिव आकाश पाटील उंद्रीकर,ग्रामपंचायत सदस्य राजु वाघमारे, ग्रा.प.सदस्य प्रतिनिधी रमेश अडबलवार, मारोती पा मटके शिवाजी पंदनवाड,पत्रकार मनोज पा.बिरादार, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनमंत पाटील वडजे,बंडु पा.वडजे दयानंद सोनकांबळे,उमेश सोनकांबळे, श्रीराम सुर्यवंशी,हाणमंत गन्लेवार, मगदूम शेख, नागोराव वादे,माधव वडजे,रंजित वाघमारे,भरत वडजे,अर्जुन सुर्यवंशी, बचत गटाचे अध्यक्ष सुरेखाबाई सुर्यवंशी,शंकर वडजे सह गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जयघोष करण्यात आला. रयतेचे राजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here