Home Breaking News कोरोना सारख्या महाभयंकर आजारांमुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या अनाथ बालकांना बालसंगोपन

कोरोना सारख्या महाभयंकर आजारांमुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या अनाथ बालकांना बालसंगोपन

175
0

_*सटाणा — शशिकांत पवार*_
कोरोना सारख्या महाभयंकर आजारांमुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या अनाथ बालकांना बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून या बालकांच्या नावावर पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने घेतला आहे. तसेच वयाची २१वर्षे पूर्ण होईपर्यंत सदरील मुदत ठेव राहणार असून २१वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम व्याजासह त्या बालकास परत मिळणार आहे.
आपल्या पालकांचे छत्र हरपल्याने कुणीही या अनाथ बालकांना संगोपनासाठी पुढे जात नाही याबाबत सामाजिक विश्लेषक रवींद्रकुमार जाधव यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना १०मे २०२१रोजी पत्र लिहून या अनाथ झालेल्या बालकांना अन्न ,वस्त्र ,निवारा सोय करावी तसेच तालुकास्तरावर बंद असलेल्या शासनमान्य बाल गृहांचे तातडीने वस्तीगृहात रूपांतर करून अनाथ बालकांची सोय करावी अशी मागणी पत्राद्वारे केली होती. बालकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले तर नजीकच्या काळात या अनाथ बालकांचा प्रश्न एक मोठी गंभीर सामाजिक समस्या बनू शकते असे सुचित करून मुख्यमंत्र्यांचे या सामाजिक समस्या कडे लक्ष वेधून याची वास्तवता ,या अनाथ बालकांची होत असलेली फरफट याबाबतचे मुख्यमंत्री महोदयांना कळवले होते .वेळीच अश्या
या अनाथ बालकांन बाबत शोध घेणे, त्यांना मदत पोचविणे व त्यांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा स्तरावर कृती दल ( टास्क फोर्स )करून त्या माध्यमातून या बालकांचा शोध घेऊन त्यांचे अन्न वस्त्र निवारा व शैक्षणिक जबाबदारी शासनाने उचलावी अशी मागणी केली होती त्याप्रमाणे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही एक सामाजिक समस्या असून सामाजिक विश्लेषक रवींद्रकुमार जाधव सुचविलेल्या समस्येवर चर्चा करून कोरोना मुळे अनाथ झालेल्या ४ हजार ५०० बालकांना शासनाने भरीव मदत करून त्यांचे पुनर्वसन करण्याबाबतचा शासन निर्णय घेऊन प्रत्येक अनाथ बालकाच्या नावे पाच लाख रुपये मुदत ठेव ठेवून ती बालकाचे एकवीस वर्षे वय पूर्ण होईपर्यंत ठेवणार असून वयाच्या एकविसाव्या वर्षी सदरील रक्कम व्याजासह बालकाला मिळेल तसेच त्यांचा पूर्ण खर्चदेखील शासन उचलणार आहे.
प्रत्येक तालुकास्तरावर बंद असलेल्या शासनमान्य बाल गृहाचे वस्तीगृहात रूपांतर करण्याबाबत देखील ठरवण्यात आलेआहे.
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनामुळे ४५०० बालके अनाथ झाले आहेत या
कालावधीत प्रत्येक जिल्हा स्तरावर कृती दल स्थापन करून त्या माध्यमातून अठरा वर्षाच्या पर्यंतचे बालकांचे सर्वे करून कोकण, पुणे, नाशिक ,अमरावती ,नागपूर आणि औरंगाबाद ५ विभागातील एकूण ४५०० ३० मे २०२१अखेर अनाथ झाल्याचे समोर आले आहे, त्यामध्ये वडिलांचे छत्र हरपलेल्या बालकांची संख्या ३७०७ तर फक्त आई गमावलेले ६०३ तर आई व वडील दोघेही गमावलेली १४१ बालके आहेत
औरंगाबाद विभागात सर्वाधिक १हजार १७८ तर पुणे विभागात १ हजार ९० बालक अनाथ झाले आहेत.
या अनाथ झालेल्या बालकांच्या सामाजिक समस्या बाबत सामाजिक विश्लेषक रवींद्रकुमार जाधव यांच्या सामाजिक विश्लेषणातून मुख्यमंत्र्यांन पर्यंत ही समस्या पोचल्या मुळेच या अनाथ बालकांना हक्काचा व स्वाभिमानाचा निवारा व भवितव्य मिळून त्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे .अशा या ऐतिहासिक व सामाजिक कार्य मुळे रवींद्रकुमार जाधव
यांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्या सामाजिक कार्याला व मार्गदर्शनला संपूर्ण महाराष्ट्राचा सलाम !

” *कोरोना सारख्या महाभयंकर आजारामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या सामाजिक समस्या बाबत माननीय मुख्यमंत्री महोदय व मंत्री महिला व बालकल्याण यांना ही सामाजिक समस्या पत्राद्वारे निदर्शनास आणुन दिली व त्यावर मंत्रिमंडळाने तात्काळ याबाबत निर्णय घेतला , त्यामुळे महाराष्ट्र पुढील सामाजिक समस्या संपली व या अनाथ बालकांना न्याय मिळून त्यांच्या अंधारमय या निर्णयामुळे सोनेरी पहाट आली याबद्दल समाधानी आहे”*

_*रविंद्रकुमार जाधव*_ सामाजिक विश्लेषक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here