Home Breaking News ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ च्या जिल्हा उपाध्यक्षपदी बबलू मुल्ला तर जिल्हा...

ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ च्या जिल्हा उपाध्यक्षपदी बबलू मुल्ला तर जिल्हा मिडिया प्रभारीपदी मुस्तफा बेटमोगरेकर यांची निवड

120
0

ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ च्या जिल्हा उपाध्यक्षपदी बबलू मुल्ला तर जिल्हा मिडिया प्रभारीपदी मुस्तफा बेटमोगरेकर यांची निवड

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ ची जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष अब्दुल बशिर माजीद यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १६ मे रोजी आयोजित बैठकीत बिनविरोध जाहीर करण्यात आली आहे. मुखेडचे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख बबलू मुल्ला यांची ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ च्या जिल्हा उपाध्यक्ष (ग्रामिण)पदी तर जिल्हा मिडिया प्रभारी (ग्रामिण)पदी मुस्तफा पिंजारी बेटमोगरेकर यांची निवड करण्यात आली आहे.
ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ या सामाजिक संघटनेत सतत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांना नेहमीच संधी दिली जाते. लोकोपयोगी कार्य करणाऱ्यांना मदत केली जाते. असेच व्यक्तिमत्व असणारे मुखेडचे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार बबलू मुल्ला व मुस्तफा पिंजारी बेटमोगरेकर यांनी मुखेड तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून या संघटनेच्या माध्यमातून अनेक विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यांचा उत्साह, कामाची पद्धत व जनसंपर्क पाहुन त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शेख बबलू मुल्ला यांची ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ च्या जिल्हा उपाध्यक्ष (ग्रामिण)पदी तर जिल्हा मिडिया प्रभारी (ग्रामिण)पदी मुस्तफा पिंजारी बेटमोगरेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ चे जिल्हाध्यक्ष अब्दुल बशीर माजीद तर उपाध्यक्ष मोईन कुरेशी, सचिव एड.श्रीधर कांबळे, भीमराव जाधव , प्रा. जुबेर खान यांची प्रमुख उपस्थिती होती.
नुतन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल इन्साफचे जिल्हा समन्वयक रियाज शेख, ओबिसी नेते श्रावण रॅपनवाड, माजी नगरसेवक राहूल लोहबंदे, शिवाजी गेडेवाड, अॅड.गोविंद डुमणे, शिवशंकर पा.कलंबरकर, बालाजी पा.बेटमोगरेकर, युवा नेते असद बल्खी, इस्माईल बागवान, अदनान पाशा, आरिफ धामणगावकर आदीसह मित्र परिवारांनी अभिनंंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here