Home माझं गाव माझं गा-हाणं वाखारी व ग्रामीण परीसरात आखाजी चा सणाचा उत्साह दिसलाच नाही कोरोणाचा परिणाम

वाखारी व ग्रामीण परीसरात आखाजी चा सणाचा उत्साह दिसलाच नाही कोरोणाचा परिणाम

361
0

राजेंद्र पाटील राऊत

वाखारी व ग्रामीण परीसरात आखाजी चा सणाचा उत्साह दिसलाच नाही कोरोणाचा परिणाम
वाखारी प्रातिनिधी दादाजी हिरे

अक्षय तृतीयेच्या म्हणजे आखाजी स ण देवळा तालुक्यात व शहरी व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने साजरा करतात
अनेक जन नवीन घर नविन गाड्या नविन दुकान किंवा नविन घराची बांधकामाची सुरवात करतात परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरी व ग्रामीण या सणाचा निरत्साह दिसून आला वाखरी येथील गरबडबाबा यात्रा उत्सव बारागाड्या तसेच भवड्या चे आयोजन करण्यात आले होते परंतु कोरोनामुळे तेही यावर्षी ही यात्रा उत्सव बंद करण्यात आला
कोरोनाव्हायरस मुळे शेतकरी वर्ग हि मोठ्या प्रमाणात अडचणीत आला असून विक्रीसाठी तयार झालेले टरबूज मिरची खरबूज तसेच टमाटे आदि माल विक्रीसाठी बाहेर नेता येत नाही व जागेवर व्यापारी येत नसल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला
या सणाला पुरणपोळी पआंबा रसाचेजेवण केले जाते परंतु यंदा आंबा अल्पप्रमाणात आल्याने व भाववाढीने अनेक जणांना नैवेद्य पुरते आंबे घ्यावे लागले व काही जनांना या पासून वंचित राहिले   अक्षयतृतीया या सणाला अनन्य साधारण महत्व असून पूर्वी हा सण ग्रामीण भागात आनंदाची पर्वणी आसे.एकत्रित कुटुंब मोठया प्रमाणात होत्या ,त्यामुळे सर्वच एकत्रित पणे हां सण मोठया आनंदाने साजरा करीत आसे. मुलांना उन्हाळ्यात शाळांना सुट्टया राहत असे तेव्हा तेव्हा ते सुट्टीत मामाच्या गावाला जात असे.सासरी असलेल्या मुली आखाजी सणासाठी जात असे तेव्हा घराच्या ओसरित किवा आंगणातील झाडाला झोका बांधून माहेरी आलेल्या सासरवासिन एकत्र जमा होऊन झोक्यावर गौराईचे गाणे गात आसे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मार्च महिन्यापासून कोरोना व्हायरस रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रदुर्भाव होऊ लागल्याने रोगाचा प्रसार होऊन नये म्हणून कोणी कोणाच्या गावाला गेले नाहीत मुलेही मामाच्या गावी गेले नाहीत .यामुळे गेल्या दोन वर्षांपासून बदलत काळामघ्ये याचे स्वरूप बदलले आहे.

Previous articleमानसिक तणाव”…कशाला म्हणतात जरा समजून घ्या
Next articleअर्थसहाय योजनेतील लाभार्थ्यांना हयातीचे दाखले सादर करण्यासाठी मुदत वाढ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here