Home कोकण चोरवणे जखमींचीवाडी ते गारवणे रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे 🛑

चोरवणे जखमींचीवाडी ते गारवणे रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे 🛑

99
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 चोरवणे जखमींचीवाडी ते गारवणे रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

खेड:-⭕रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चोरवणे जखमींची वाडी रस्त्याचे काम कित्येक वर्षे रखडले होते २६ जानेवारी या दिवशी श्री संतोष अनंत मेस्त्री आणि ग्रामस्थ यांनी आमरण उपोषणा चा इशारा देताच बांधकाम खात्याकडून १५ लाख आणि सन्मानीय श्री अरविंद चव्हाण साहेब यांच्याकडून 15 लाख निधी चे पत्रक देऊन उपोषण मागे घेतले गेले होते पण त्या कामाचे अद्याप काही समजले नाही परंतु.या रस्त्याचे काम २०१९-२०२० ला मंजूर झाले होते ते काम या वर्षी मार्च महिन्यात सुरू करण्यात आले आहे चोरवणे जखमीची वाडी रस्त्याचे सुरू करण्यात आलेले डांबरीकरण अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे असे चोरवणे जखमीचे वाडीतील ग्रामस्थ म्हणणे आहे तशी तक्रार करत आहेत.ही तक्रार चिपळूण बांधकाम विभागाचे श्री.कदम रावसाहेब यांना वेळोवेळी देऊन कदम रावसाहेब त्याकडे गेली १ महिने दुर्लक्ष करत आहेत.

वरील रस्त्या बाबत सतत प्रयत्न शील असणारे जल फाउंडेशन चे सल्लागार श्री वसंत मोरे यांनी सतत सूचना देऊनही वरिष्ठांकडून दुर्लक्ष केले जात आहे चोरवणे जखमींचे वाडीचे ग्रामस्थ आणि श्री सुनील मेस्त्री , यांनी रावसाहेब यांना वेळोवेळी फोन करून सुद्धा आजपर्यंत रावसाहेब रास्ता पाहण्यासाठी आले नाहीत.

त्यामुळे चोरवणे जखमींची वाडीतील ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.येत्या दोन ते तीन दिवसांत कदम रावसाहेब आणि बांधकाम खात्यातील संबंधित अधिकारी चोरवणे जखमीची वाडी मध्ये हजर न झाल्यास १ मे ला पुन्हा उपोषणाला बसू असे श्री संतोष मेस्त्री, श्री सुनील मेस्त्री आणि ग्रामस्थ यांनी सांगितले आहे.⭕

Previous articleदौंड तालुक्यातील नानगावच्या महिलांनी ॲमेझॉनवर गोवऱ्या विकल्या, तेलंगाणामधून वाढती मागणी 🛑
Next articleबोरज नळ पाणी योजनेच्या टाकीच्या नदी पात्रात मासेमारी की केमिकल नक्की काय याची सखोल चौकशी करा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here