Home नांदेड नायगाव येथे साई माऊली सार्वजनिक कोवीड सेंटरचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर...

नायगाव येथे साई माऊली सार्वजनिक कोवीड सेंटरचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या हस्ते संपन्न..

85
0

राजेंद्र पाटील राऊत

नायगाव येथे साई माऊली सार्वजनिक कोवीड सेंटरचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या हस्ते संपन्न..

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नायगाव येथे साई माऊली सार्वजनिक कोवीड सेंटरचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ
विपीन ईटणकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.संपूर्ण देशात तसेच राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. हे संक्रमण रोखण्यासाठी राज्यस्तरावर अनेक प्रयत्न सुरू आहेत. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने रुग्णांना उपचाराकरीता बेड मिळणे कठीण झाले आहे. या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन नायगाव येथे साई माऊली सार्वजनिक कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. आज या कोविड सेंटरचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटनप्रसंगी विधानपरिषदेचे आमदार अमरनाथ राजूरकर, शिक्षण सभापती संजय बेळगे,पंचायत समिती उपसभापती संजय शेळगावकर,धनराज शिरोळे, नगरपंचायत चे नगराध्यक्ष, नगरसेवक, डॉक्टर सेलचे पदाधिकारी,तसेच इतर राजकीय व शासकीय पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleनाशिकला पोलिसांनी बालविवाह रोखला गुन्हा दाखल
Next articleधैर्य सामाजिक संस्थे मार्फ़त शब्दवेळ वाचनालय उपक्रमाचे उद्घाटन 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here