Home कोरोना ब्रेकिंग धडकी भरवणारी आकडेवारी! देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण

धडकी भरवणारी आकडेवारी! देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण

157
0

राजेंद्र पाटील राऊत

धडकी भरवणारी आकडेवारी! देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

करोनाचे ढग पुन्हा एकदा गडद होताना दिसत आहे. प्रचंड वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील परिस्थिती बिकट झाली असून, देशातील परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक होत असल्याचेच चित्र आहे.
कोरोना आकडेवारी :
▪️ देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत.
▪️ तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.
▪️ देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला
▪️ देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील रुग्णवाढीचा वेग कायम :
राज्यात शनिवारी दिवसभरात ५५ हजार ४११ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ३०९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.७२ टक्के इतका आहे. ५३ हजार ००५ रुग्ण करोनातून बरे देखील झाले. राज्यात आजपर्यंत एकूण २७,४८,१५३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८२.१८ टक्के एवढे झाले आहे.

Previous articleतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा
Next articleकोरोनाने जिल्हय़ात टाकला टॉपगिअर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here