Home माझं गाव माझं गा-हाणं मेट भुजबळ नॉलेज सिटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,समता परिषद व मनपा यांच्या संयुक्त...

मेट भुजबळ नॉलेज सिटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,समता परिषद व मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.मीनाताई ठाकरे स्टेडियम मध्ये १८० ऑक्सिजन व १०५ सीसीसी बेडची व्यवस्था

116
0

राजेंद्र पाटील राऊत

मेट भुजबळ नॉलेज सिटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,समता परिषद व मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.मीनाताई ठाकरे स्टेडियम मध्ये १८० ऑक्सिजन व १०५ सीसीसी बेडची व्यवस्था

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून स्व.मीनाताई ठाकरे विभागीय क्रिडा संकुल येथील डेडिकेटेड कोविड केअर सेंटरची पाहणी

(राजेंद्र वाघ/दिलीप चव्हाण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
नाशिक,दि.१० एप्रिल:- नाशिक शहर व जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक दायित्वातून मेट भुजबळ नॉलेज सिटी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व नाशिक महानगरपालिका यांच्या समन्वयातून विभागीय क्रीडा संकुलातील स्व.मीनाताई ठाकरे स्टेडियम नाशिक येथे संपूर्ण १८० ऑक्सिजन बेड्स व १०५ सीसीसी बेड्सचे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. या कोविड केअर सेंटरची आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे व मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या समवेत पाहणी केली.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, शहर अभियंता संजय घुगे, मनपा प्रकल्प संचालिका डॉ.कल्पना कुटे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे,प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक,कविता कर्डक,आंबदास खैरे, समाधान जाधव, गौरव गोवर्धने यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या संकटाशी सामना करण्यासाठी शासनास मदत व्हावी अशी संकल्पना भुजबळ नॉलेज सिटीचे विश्वस्त समीर भुजबळ यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मांडली. त्यानुसार विभागीय क्रीडा संकुलातील स्व.मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे संपूर्ण १८० ऑक्सिजन बेड्सचे नाशिक शहरातील कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. तसेच या कोविड सेंटर मध्ये १०५ सीसीसी बेडस असणार आहे.

या कोविड केअर सेंटर साठी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या सहकार्यातून उभारण्यात येत असून यासाठी नाशिक महानगरपालिका समन्वयक म्हणून आपली जबाबदारी पार पाडणार आहे. संपूर्ण ऑक्सिजन बेड्स असलेले हे नाशिक शहरातील कोविड केअर सेंटर आहे. या ठिकाणी रुग्णांना चांगले जेवण, पिण्याचे पाणी, औषधे, खेळ व मनोरंजनाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सर्व कोविड सेंटरची आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. तसेच यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना नियोजनाबाबत सूचना देखील दिल्या.

Previous articleसावध ऐका पुढल्या हाका… – डॉ सचिन लांडगे.
Next articleगतवर्षाप्रमाणे यावर्षीही कोरोना रूग्णांची तयारी ठेवा , पालकमंत्री सतेज पाटील
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here