Home Breaking News खार्डी गावात रेती उपसा जोरात,रेती माफिया सक्रिय.

खार्डी गावात रेती उपसा जोरात,रेती माफिया सक्रिय.

145
0

खार्डी गावात रेती उपसा जोरात,रेती माफिया सक्रिय.

विभागिय संपादक पालघर वैभव पाटिल
पालघर: खार्डी ता.पालघर येथील सरपंचानी वाळू उपसा करीत असलेल्या वाळू माफियांवर कारवाही करत वाळू जप्त करून ग्रामपंचायत खार्डी मध्ये जमा केली आहे. काही रेती व्यावसायिक व गावकरी ह्यांनी मिळून सरपंच खार्डी ह्याच्यावर वाळू उपसा करिता कुंडी तयार करून खाडी भागातील कांदनवन नष्ट केल्याच्या आरोप करीत कांदनवन कक्ष वनपर्यवेक्षक सफाळे ह्यांच्या कडे तक्रार दाखल केली आहे. मात्र सरपंचांनी सदर आरोपाचे खंडन केले आहे.

ग्रामपंचायत खार्डी हद्दी मध्ये सरपंच यांनी कारवाही करून वाळू जप्त केली आहे.मात्र वाळू उपसा करणारे पळून गेल्याने वाळू उपसा करणाऱ्याची ओळख पटलेली नाही खार्डी गावात मोठ्या प्रमाणावर  वाळू वाहतूक होत असून रेती माफियांनी वाळूसाठा करून ठेवल्याचे निदर्शनास आले आहे.सर्वे क्र. ६०५ लगत जयवंत शांताराम भोईर याच्या ताब्यात असलेल्या जागेत मोठ्या प्रमाणात रेतीसाठा केल्याचा आढळून आले आहे.तलाठी मंडळ अधिकारी याच्यावर लवकरच कारवाही करतील अशी अपेक्षा खार्डी गावचे सरपंच राजेश घरात यांनी व्यक्त केली आहे.

रेती उपसा करणाऱ्यावर कारवाही केली म्हणून माझ्याविरुद्ध षडयंत्र करून खोटा आरोप करण्यात येत आहे.
सरपंच, खार्डी ग्रामपंचायत, राजेश घरात.

लवकरच,,,
खार्डी गावातील शासकीय जमिनी लाटनार्या भूमाफियावर वरदहस्त कुणाचा…

Previous articleशेळगांव गौरी येथे कोरोना covid-19 लस व जनजागृती फेरी सपंन्न…
Next articleधक्कादायक” देगलूर – बिलोली मतदारसंघाचे (काँग्रेसचे) आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे निधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here