• Home
  • पुण्यात आता कडक निर्बंध; वाचा नवीन नियमावली 🛑

पुण्यात आता कडक निर्बंध; वाचा नवीन नियमावली 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210328-WA0042.jpg

🛑 पुण्यात आता कडक निर्बंध; वाचा नवीन नियमावली 🛑
✍️ पुणे 🙁 विजय पवार पुणे प्रतिनिधी प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

पुणे -⭕कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली असून नाईलाजाने कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते.

जे नियम आहेत ते पाळा असं आवाहन अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं.

पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण पुण्यात असून सक्रीय रुग्णांची संख्या ५० हजारांजवळ पोहोचली आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात सक्रीय रुग्ण ४९ हजार ७१० इतके होते.

याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. रुग्णसंख्या कमी झाली नाही तर पुढच्या शुक्रवारी आम्ही कठोर निर्णय़ घेऊ असे अजित पवार यांनी सांगितलं.

जे नियम आहेत ते पाळा असं आवाहन अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर बंधनकारक आहे. कोरोनाची पहिली लाट होती तेव्हा जी भीती होती ती आता राहिलेली नाही. लोकांच्या निष्काळजीपणाचा फटका बसला असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.

काय असतील नियम –

बोर्डाच्या परीक्षा नियमानुसार होतील

रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय आधीसारखाच

लग्न 50 पेक्षा जास्त संख्या नको

अंत्यविधीची कार्यक्रम 20 लोक असावेत

शाळा महाविद्यालये बंद राहणार

सार्वजनिक उद्यानं सकाळीच सुरु राहतील

मॉल्स, मार्केट, हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपटगृहांत 50 टक्के उपस्थिती

सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार

सर्व राजकीय कार्यक्रमांना बंदी

पंचायतीपासून संसदेपर्यंत असणारे प्रतिनिधींनी खासगी कार्यक्रम बंद करावेत ⭕

anews Banner

Leave A Comment