Home पुणे दंगल गर्लच्या बहिणीची आत्महत्या! ‘हे’ कारण आले समोर 🛑

दंगल गर्लच्या बहिणीची आत्महत्या! ‘हे’ कारण आले समोर 🛑

94
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 दंगल गर्लच्या बहिणीची आत्महत्या! ‘हे’ कारण आले समोर 🛑
✍️ विशेष रिपोर्ट 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

भारतातील कुस्ती क्षेत्रात फोगट कुटुंब प्रसिद्ध आहे. मात्र आता याच कुटुंबाला एका दुर्दैवी घटनेमुळे दु:खाचा सामना करावा लागत आहे. भारताच्या स्टार कुस्तीपटू गीता आणि बबीता फोगट यांची आतेबहिण रितिका हीने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.

कुस्तीच्या अंतिम सामन्यात झालेला पराभव सहन करता न आल्याने तिने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.

१७ वर्षीय रितिकालाही फोगट बहिणींप्रमाणे कुस्तीपटू बनायचे होते. त्यासाठी ती ५ वर्षे आपले मामा महावीर फोगट यांच्या अकादमीमध्ये सराव करत होती. तिने नुकत्याच १२ ते १४ दरम्यान भरतपूरमधील लोहागढ स्टेडियममध्ये झालेल्या राज्यस्थरीय सब-ज्यूनियर आणि ज्यूनियर महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता.या स्पर्धेत ती अंतिम सामन्यातही पोहचली होती. या सामन्यासाठी महावीर फोगट देखील उपस्थित होते, असे समजत आहे. मात्र अंतिम सामन्यात तिला एका गुणाने पराभवाचा सामना करावा लागला.हा पराभव रितिकाला सहन झाला नाही.

त्यामुळे तिने १५ मार्चला रात्री महावीर फोगट यांच्या गावी बालाली येथील एका खोलीत पंख्याला ओढणी बांधून फाशी घेतली, असे समोर येत आहे.तिचा मृतदेह पोस्टमार्टम केल्यानंतर तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्त करण्यात आला असून तिच्यावर अंतिम संस्कार तिच्या गावी राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील जैतपूरमध्ये करण्यात आले.

तिचा मृतदेह पोस्टमार्टम केल्यानंतर तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्त करण्यात आला असून तिच्यावर अंतिम संस्कार तिच्या गावी राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील जैतपूरमध्ये करण्यात आले.

या प्रकरणाबद्दल डिएसपी राम सिंग यांनी सांगितले आहे की पोस्टमार्टमनंतर तिचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला आहे.

तसेच त्यांना ती अंतिम सामन्यात पराभूत झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली असून आता या प्रकरणाची चौकशी पोलिस करत आहेत.⭕

Previous articleपश्चिम बंगालमध्ये प्रचाराला येऊ नका, अन्यथा….! ’’काँग्रेसचे शरद पवारांना पत्र ” 🛑
Next article🛑 मराठ्यांचा झेंडा साता समुद्रापार …! मराठा पाऊल पडते पुढे 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here