Home कोकण खेड तालुक्यातील मदत ग्रुप यांच्यावतीने स्त्री शक्तीचा सन्मान

खेड तालुक्यातील मदत ग्रुप यांच्यावतीने स्त्री शक्तीचा सन्मान

144
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 खेड तालुक्यातील मदत ग्रुप यांच्यावतीने स्त्री शक्तीचा सन्मान 🛑
✍️ खेड:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

खेड:-⭕ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शासकीय ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय कळंबणी खेड, येथील कार्यरत असलेल्या समस्त महिला वर्गाचा सन्मान करण्यात आला.

मानवतेच्या दृष्टिकोनातून साकारलेला मदत ग्रुप, खेड यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मदत ग्रुप,खेड चे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रसाद गांधी हे अविरत समाजसेवे साठी धडपडत असतात त्त्यांच्या कल्पनेतून साकारलेल्या मदत ग्रुप, खेड च्या वतीने कळंबणी रुग्णालय येथील महिला डॉक्टर, परिचारिका व सफाईकामगार (स्त्री वर्ग) यांचा सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून सौ.सुरभी धामणस्कर यांनी रुग्णालयामधील सर्व स्त्री कर्मचारी वर्गाच्या कामाचे कौतूक केले .या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक- डॉ सगरे,कोविड -19नोडल ऑफिसर डॉ गरुड यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कोविड 19च्या संकटकालीन वेळी या सर्व कर्मचारी वर्गाने केलेले कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. कठीण परिस्थिती मध्ये स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता अनेक रुग्णांची सेवा केली.

या त्त्यांच्या कार्या चा सन्मान मदत ग्रुप, खेड च्या वतीने करण्यात आला. त्या प्रसंगी सन्मान मूर्ती म्हणून डाॅ.श्रीमती.रुची पुजारा,डाॅ.बाईत,डाॅ.सोफीया शेख,श्रीमती.दिपाली हंबीर,श्रीमती.उज्ज्वला पाष्टे,श्रीमती.पवार,श्रीमती.बोले,श्रीमती .विचारे.(सफाईकर्मचारी,स्त्री वर्ग) श्रीमती.जाधव,श्रीमती.चव्हाण,श्रीमती.आंजरलेकर,श्रीमती.गौरी लिमये,श्रीमती. सावंत,श्रीमती.सदरे,श्रीमती.मोहीत श्रीमती.गजने,श्रीमती.पल्लवी पवार,श्रीमती.नारकर,श्रीमती.दैत,श्रीमती.राधिका जाधव,श्रीमती.प्रणिता चव्हाण.श्रीमती.रूपाली खताते. (परीचारिका स्त्री वर्ग ) या प्रसंगी मदत ग्रुप,खेड चे अध्यक्ष सन्मा. श्री प्रसाद गांधी,सदस्या-सौ.तृप्ती प्रसाद गांधी (खजिनदार),सभासद सौ.संध्या भोसले मॅडम,श्रीमती.अर्चना सागवेकर मॅडम,सौ.नेहा कासार,सौ.सुरभी धामणसकर मॅडम ,सौ.नम्रता वडके,कु. प्रसिद्धी गांधी आदी…..उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ.संध्या भोसले मॅडम यांनी केले अध्यक्षा सौ सुरभी धामणस्कर यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here