• Home
  • जागतिक महिला दिवस साजरा

जागतिक महिला दिवस साजरा

राजेंद्र पाटील राऊत

20210308_224330.jpg

जागतिक महिला दिवस साजरा
(युवराज देवरे प्रतिनिधी दहिवड)
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान नाशिक ता- देवळा दहिवड.
दहीवड- एकता महिला ग्राम संघ यामधून दहीवड येथे 8 मार्च 2021 रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.या दिवशी महिलांना स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी संधी दिली.तसेच महिलांना हळदी कुंकू,योगा, कोविड 19,या विषयावर मार्गदर्शन करून त्यांना उंच भरारी कसे घेता येईल,स्वतःचे स्वप्न पूर्ण करून अस्तित्व निर्माण करण्याची संधी उपलब्ध कशी होईल याविषयी माहिती देण्यात आली
एकता महिला ग्राम संघातील पदाधिकारी CRP सरला सोनवणे,अंगणवाडी सेविका,मदतनीस,ग्राम संघातील महिला,गटातील महिला यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.

anews Banner

Leave A Comment