Home नांदेड महात्मा फुले महाविद्यालयात मराठवाडा भूषण डॉ.दिलीप पुंडे यांचा सत्कार संपन्न..

महात्मा फुले महाविद्यालयात मराठवाडा भूषण डॉ.दिलीप पुंडे यांचा सत्कार संपन्न..

111
0

राजेंद्र पाटील राऊत

महात्मा फुले महाविद्यालयात मराठवाडा भूषण डॉ.दिलीप पुंडे यांचा सत्कार संपन्न..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार. (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात सांस्कृतिक व विद्यार्थी कल्याण विभागाकडून ज्येष्ठ सर्पतज्ञ व मुखेड भूषण दिलीप पुंडे यांचा जागतिक आरोग्य संघटनेत सदस्य म्हणून निवड झाल्यामुळे सह्दय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिने , सत्कारमूर्ती मराठवाडा भूषण व मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे , प्रमुख पाहुणे उपप्राचार्य के. बलाराजू , प्रा. सी.बी. साखरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागातील प्रा.डॉ. डी.के.आहेर तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. सी.एन.एकलारे यांनी केले.
सत्कारमूर्तीचे जागतिक स्तरावरील निवडीमुळे वीरभद्र शिक्षण संस्था व महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय , मुखेड यांच्या वतीने कोरोनाच्या नियमांचा काटेकोरपणे पालन करून डॉ.दिलीप पुंडे यांना शाल ,श्रीफळ व पुष्पहार देऊन प्राचार्य डॉ. अडकिणे यांनी सत्कार केले. विविध विभागाकडून सुद्धा सत्कार करण्यात आले . कार्यक्रमाची भूमिका व अध्यक्षीय समारोप डॉ. अडकिणे यांनी केले तर मनोगतात प्रा.साखरे यांनी आपले विचार मांडले. सत्काराला उत्तर देताना डॉ. पुंडे यांनी मला मुखेड वासियांनी गल्लीपासून ते ग्लोबल पर्यंत जाण्यासाठी खूप प्रेम व सहकार्य केले. शिक्षणाने माणूस परिपूर्ण बनत असतो. आदर्श शिक्षकांची नितांत गरज असते . मला शिकवलेल्या गुरुजनांचा चेहरा आजही जशास तसा आठवतो. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग माझे आयुष्य घडवण्यासाठी केले तर मी माझ्या ज्ञानाचा उपयोग या परिसरातील जनसामान्यांची सेवा करण्यासाठी करत आहे . कोणतेही कार्य करत असताना विद्यार्थी आपल्यामधील आत्मविश्वास जागा करून भविष्यातील येणार्‍या संधीचे सोने करून घेणे काळाची गरज आहे . हे तत्व मी माझ्या आयुष्यात अंगीकारले आहे . म्हणूनच जागतिकस्तरावर मला मिळालेल्या गौरवाचा आपण यथोचित याठिकाणी सन्मान करत आहात. या भावपूर्ण सत्काराबद्दल आपण व इतर सर्व स्तरातून केले जाणारे सत्कार हे माझ्या कार्याची पावती आहे असे गौरवोद्गार व्यक्त केले.
महाविद्यालयातील प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची बहुसंख्येने उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here