Home पुणे सचिन शिंदेचा शासकीय जागेत दशक्रिया फलक लावणाऱ्यावर गुन्हा दाखल

सचिन शिंदेचा शासकीय जागेत दशक्रिया फलक लावणाऱ्यावर गुन्हा दाखल

124
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 सचिन शिंदेचा शासकीय जागेत दशक्रिया फलक लावणाऱ्यावर गुन्हा दाखल 🛑
✍️ शिरुर 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

शिक्रापूर –⭕ वढू बुद्रुक ता. शिरूर येथे गुंड प्रवृत्तीचा इसम असलेला गोल्डन म्यान समजल्या जाणाऱ्या मयत सचिन नानासाहेब शिंदे याच्या दशक्रिया फलक विनापरवाना शासकीय जागेत लावला असल्याची घटना घडली असताना सदर फलक लावणाऱ्या व्यक्तीवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची घडली असून मोन्या उर्फ शुभम अशोक भंडारे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

लोणीकंद ता. हवेली येथे दहा दिवसांपूर्वी गुंड सचिन नानासाहेब शिंदे यांचा काही युवकांनी गोळ्या घालून खून केला होता. सदर घटनेनंतर अनेक ठिकाणी सचिन शिंदे यांचे दशक्रिया विधी फलक लावण्यात आले होते.

तर १३ फेब्रुवारी रोजी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे वडु बुद्रुक गावातून गस्त घालत असताना त्यांना वडू गावातील के एम हॉस्पिटल समोर शासकीय जागेत रोडच्या कडेला शुभम भंडारे या युवकाने मयत सचिन शिंदेचा दशक्रिया विधी असलेला वढू बुद्रुक येथील तर परिसरातील बाह्य स्वरूप कमी करून तेथील जागेच्या सौंदर्यास हानी पोहोचेल अशा पद्धतीने त्या जागेचे विद्रुपीकरण करून नैसर्गिक स्वरूपात बादा निर्माण झाली.अशा पद्धतीने मला मोठा फ्लेक्स लावल्याचे समोर आले, याबाबत शिक्रापूर पोलिसांनी मोन्या उर्फ शुभम अशोक भंडारे रा. वढू बुद्रुक ता. शिरूर जि. पुणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पंडित मांजरे हे करत आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोठेही शासकीय जागेत अथवा कोठेही कोणीही विनापरवाना व नैसर्गिक सौंदर्यात बाधा होईल अशा पद्धतीने विविध कार्यक्रमांचे फ्लेक्स लावले तसेच कोठेही नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीचे फ्लेक्स अथवा होर्डिंग लावल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी सांगितले….⭕

Previous articleकुख्यात गुंड गजानन मारणे तुरुंगातून सुटला; स्वागताला ५०० हून अधिक गाड्यांचा ताफा 🛑
Next articleखेड तालुका रहिवासी मंच मुंबई यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here