Home नांदेड मुखेड तालुक्यातील मौजे भाटापूर येथील ग्रामपंचायत सरपंचपदी प्रतिभा वाघमारे व उपसरपंचपदी माधुरी...

मुखेड तालुक्यातील मौजे भाटापूर येथील ग्रामपंचायत सरपंचपदी प्रतिभा वाघमारे व उपसरपंचपदी माधुरी वाघमारे यांची बिनविरोध निवड..

142
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील मौजे भाटापूर येथील ग्रामपंचायत सरपंचपदी प्रतिभा वाघमारे व उपसरपंचपदी माधुरी वाघमारे यांची बिनविरोध निवड..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार. (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे भाटापूर येथील ग्रामपंचायत सरपंचपदी प्रतिभा वाघमारे व उपसरपंच पदी माधुरी वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी निवडणुक अधिकारी आर. एम. भालके साहेब यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली.सरपंच पदासाठी प्रतिभा सोपान वाघमारे तर उपसरपंच पदासाठी माधुरी संजय वाघमारे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री भालके सर यांनी सरपंच पदी प्रतिभा वाघमारे तर उपसरपंचपदी माधुरी वाघमारे यांची निवड घोषित करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच उपस्थित होते .नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्यांचा पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. यावेळी माधवराव गुरुजी भाटा पुरकर , बालाजी देशमुख यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या निवडीबद्दल गावातून व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here