Home मुंबई राजे श्री शिवछत्रपती कोकण प्रतिष्ठान टिटवाळा या मंडळाचा 3 रा वर्धापन दिन...

राजे श्री शिवछत्रपती कोकण प्रतिष्ठान टिटवाळा या मंडळाचा 3 रा वर्धापन दिन आणि शिवजयंती उत्सव 🛑

184
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 राजे श्री शिवछत्रपती कोकण प्रतिष्ठान टिटवाळा या मंडळाचा 3 रा वर्धापन दिन आणि शिवजयंती उत्सव 🛑
✍️ कल्याण 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

कल्याण:-⭕टिटवाळा ता. कल्याण येथील राजे श्री शिवछत्रपती कोकण प्रतिष्ठान मंडळ यांचा तिसरा वर्धापन दिन १९फेब्रुवारी २०२१ रोजी संपन्न होणार आहे. त्याचबरोबर १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

शुक्रवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ७:३० वाजता शिवप्रतिमा पूजन सोहळा,सकाळी ८ वाजता ते दुपारी २ वाजता महा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.दुपारी ४ वाजता रंगीबेरंगी महिलांचे खेळ आणि विविध स्पर्धा, सायंकाळी ५ वाजता महिला हळदी कुंकू, सायंकाळी ६ वाजता शिव व्याख्यान , सायंकाळी ६:३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम , विशेष गौरव पुरस्कार ,कोरोना योध्दा सन्मान,आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार तसेच कोकनरत्न साने गुरुजी पुरस्कार ,सायंकाळी ७ वाजता सत्कार समारंभ आणि अतिथी स्वागत, सायंकाळी ८ वाजता मनोगत व समारोप असे कार्यक्रम होणार आहेत.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सन्मानीय श्री.विश्वनाथदादा भोईर(आमदार), सन्मानीय श्री.राजुजी वंजारी सर(वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी टिटवाळा), प्रमुख मार्गदर्शक सन्मानीय सौ.नमिताताई पाटील(नगरसेविका, शिक्षण समिती सभापती),सन्मानिय श्री.मयुरशेठ पाटील(मा. नगरसेवक), सन्मानीय श्री. विजयभाऊ देशेकर(जनसेवक), सन्मानिय श्री.नामदेवजी बुटरे (शिवसेना ग्रामीण सचिव कल्याण), श्री.रविशेठ पाटील, श्री.किशोरभाई शुक्ला, श्री.विजयजी सुर्वे, श्री.सुनीलजी वायले, श्री.महेशजी गायकवाड, श्री.विजयजी काटकर, श्री.शिवाजी गोंधळे , श्री.संतोषजी तरे, श्री.संपतबुवा शिरसाट आणि अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत…⭕

Previous articleपन्हाळा तालुक्यामधे 100% पोलिओ लसीकरण
Next article🛑 लोटे एमआयडीसी पासून होणाऱ्या प्रदूषण बाबत कृषी अधिकारी यांना धामणदेवी विभागातील ग्रामस्थ आणि संदिप फडकले यांचे निवेदन 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here