• Home
  • दहिदी ग्रामपंचायत सरपंच सौ.वाघ तर उपसरपंचपदी गुलाब बिचकुले यांची निवड

दहिदी ग्रामपंचायत सरपंच सौ.वाघ तर उपसरपंचपदी गुलाब बिचकुले यांची निवड

राजेंद्र पाटील राऊत

2gram_20panchayat_20election_203.jpg

दहिदी ग्रामपंचायत सरपंच सौ.वाघ तर
उपसरपंचपदी गुलाब बिचकुले यांची निवड
(सुभाष कचवे सिनियर रिपोर्टर युवा मराठा न्युज)
मालेगांव-तालुक्यातील दहिदी ग्रामपंंचायतीच्या आज झालेल्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणूकीत सौ.निर्जलाताई सोपान वाघ यांची सरपंचपदी तर गुलाब शांताराम बिचकुले यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.
संपूर्ण मालेगांव तालुक्याचे लक्ष या गावाच्या सरपंच उपसरपंच निवडीकडे लागलेले होते. सौ.निर्जलाताई वाघ या अगोदरही दहिदी गावाच्या सरपंच होत्या त्यामुळे त्यांना विकासकामांचा चांगला अनुभव आहे.तर गुलाब शांताराम बिचकुले यांनी पहिल्यांदाच ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली आणि ते या निवडणूकीतील “खरे किंगमेकर”ठरलेत.गेल्या ६५ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच गुलाब शांताराम बिचकुले यांच्या रुपाने उपसरपंच म्हणून धनगर समाजाला प्रथमच संधी मिळाल्याने गाव विकासासाठी आपण सदैव तत्पर राहू अशी ग्वाही नवनिर्वाचीत सरपंच सौ.निर्जलाताई वाघ,व उपसरपंच गुलाब बिचकुले यांनी “युवा मराठा” शी बोलताना दिली.या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडीमुळे दहिदी गावात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचे बघावयास मिळाले.:

anews Banner

Leave A Comment