• Home
  • 🛑 पोलीस दलात १२ हजार पदांची जम्बो भरती; गृहमंत्र्यांनी दिली ‘ही’ डेडलाइन 🛑

🛑 पोलीस दलात १२ हजार पदांची जम्बो भरती; गृहमंत्र्यांनी दिली ‘ही’ डेडलाइन 🛑

🛑 पोलीस दलात १२ हजार पदांची जम्बो भरती; गृहमंत्र्यांनी दिली ‘ही’ डेडलाइन 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 18 जुलै : ⭕ गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पोलीस दलातील १२ हजार ५३८ विविध पदे तातडीने भरण्याचे आदेश देशमुख यांनी दिले. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

बेरोजगार असलेल्या आणि लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या तरुणांसाठी खूश खबर आहे. राज्यात पोलीस दलात दोन-चार हजार नव्हे तर १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत ही पदे भरण्यात यावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.⭕

anews Banner

Leave A Comment