Home मुंबई मुंबई येथे काँग्रेस नेते नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई येथे काँग्रेस नेते नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

131
0

राजेंद्र पाटील राऊत

मुंबई येथे काँग्रेस नेते नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सादर केल्याची माहिती आहे. राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळेच नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता नवा विधानसभा अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
नाना पटोले दि. 4 फेब्रुवारी रोजी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले. यानंतर नाना पटोले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी त्यांचे आभार मानले. त्यानंतर नाना पटोले थेट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे गेले. त्यांनी त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला.

युवा मराठा न्युज नेटवर्क

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here