Home नांदेड मुखेड तालुक्यातील उंद्री प.दे. येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस चांगला प्रतिसाद.

मुखेड तालुक्यातील उंद्री प.दे. येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस चांगला प्रतिसाद.

187

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील उंद्री प.दे. येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस चांगला प्रतिसाद.
मनोज बिरादार मुखेड तालुका प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
दि. 31 जानेवारी 2021रोजी उंद्री प.दे ता. मुखेड येथे पल्स पोलिओ मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला असून गावातील एकूण 174 पैकी 171 बालकांना लसीचा डोस पाजण्यात आला. व तसेच शेजारील सोसायटी तांडा , बेंडकी तांडा , खोरी तांडा येथील एकूण 33 बालकांपैकी 31 बालकास पोलिओ डोस पाजण्यात आला. पल्स पोलिओ मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला असून याकामी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपली कामगिरी अतिशय चांगली बजावली असून यात डॉ.जाधव एस.व्ही., खरात जे.एन, पांचाळ एन.बी., नागठाणे एस. के. मिटाळकर एस.जी. भोकरे एम.डी. व अंगणवाडी मदतनीस यांनी अतिशय मेहनतीने मोहीम यशस्वी केली. त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. अशी माहिती आरोग्य खात्याच्या वतीने देण्यात आली.

Previous articleरोहा बसस्थानकाची दुरावस्था नागरी सेवेत सुधारणा करण्यासाठी नँशनल पिपल्स पार्टी कार्यकर्ते आग्रही .
Next articleनागपूर जिल्ह्यात पल्स पोलिओ उत्साहात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.