Home नांदेड मुखेड तालुक्यातील तुपदाळ येथील दिलीप पाटील बेटमोगरेकर यांचे विश्वासू समर्थक संदीप घाटे...

मुखेड तालुक्यातील तुपदाळ येथील दिलीप पाटील बेटमोगरेकर यांचे विश्वासू समर्थक संदीप घाटे यांच्या जनविकास पॅनलचा दणदणीत विजय.

235
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील तुपदाळ येथील दिलीप पाटील बेटमोगरेकर यांचे विश्वासू समर्थक संदीप घाटे यांच्या जनविकास पॅनलचा दणदणीत विजय.
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील ग्रामपंचायतीचा निकाल दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी घोषित करण्यात आला यात मुखेड तालुक्यातील मौजे तुपदाळ येथील जनविकास पॅनलने घवघवीत यश मिळवले आहे. यात 1) प्रेमला बाई चांदोबा घाटे 2) कंबळबाई परमेश्वर इंगोले 3) अनिताबाई नागोराव पिटलेवाड 4) कान्हो पात्रा माधवराव बोडके (बिनविरोध)5) ज्ञानेश्वर नरसिंगराव बेळे (बिनविरोध) एकूण सात पैकी पाच उमेदवार त्यातून दोन बिनविरोध तीन प्रचंड मताधिक्क्याने निवडून आले आहेत. त्यामुळे जनविकास पॅनलचा दणदणीत विजय झाला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर साहेबांचे विश्वासू समर्थक म्हणून ओळखले जाणारे तुपदाळ नगरीचे संदीप चंद्रकांतराव घाटे सह कार्यकर्ते विजयी उमेदवार उपस्थित होते त्यांच्या या विजयाबद्दल गावातून व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here