Home नांदेड नांदेड जिल्ह्यात पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला

नांदेड जिल्ह्यात पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला

168

राजेंद्र पाटील राऊत

नांदेड जिल्ह्यात पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला!     देगलूर ,( संजय कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा  न्युज नेटवर्क)-                                   नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील दिवशी या गावातील आदिवासी मन्नेरवारलू जमातीच्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर दि. 21-1- 2021 च्या पहाटे एकच्या सुमारास बलात्कार करून तिचा निर्घुण खून करण्यात आला आहे. अद्यापही मुख्य आरोपी फरार असून, एक संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय भोकर येथे पोस्टमोर्टमसाठी बॉडी आणली असता, संबंधित भोकर येथील डॉक्टर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात in कॅमेरा पोस्टमार्टम करण्यासाठी घेऊन जावं,अशी विनंती गावकऱ्यांना केली आहे. इतकी भयंकर घटना होऊनसुद्धा घटनास्थळी एकही वरिष्ठ अधिकारी भेट दिली नाही. ही फार खेदाची बाब आहे. आणि बॉडी सोबत एकही वरिष्ठ अधिकारी नाही. फक्त एक कॉन्स्टेबल सोबत ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री साहेब, आदिवासी मंत्री साहेब, संरक्षण मंत्री साहेब, व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री मा.ना. अशोकरावजी चव्हाण साहेबांनी व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर साहेबांनी
समाजाला काळिमा फासणाऱ्या चिमुकलीच्या बलात्कार प्रकरणाकडे विशेष लक्ष घालून आरोपीला ताबडतोब पकडून महाविकास आघाडीच्या पुरोगामी शासनाने अनु घातलेल्या स्त्रीशक्ती कायद्यांतर्गत फाशीची शिक्षा लवकर देण्यात यावी. अन्यथा राष्ट्रीय आदिवासी मन्नेरवारलू कल्याण सेवा प्रतिष्ठान च्या वतीने व आदिवासी जमातीच्या लाखो जनसमुदायाच्या वतीने निषेध व आक्रोश महामोर्चा प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Previous articleकोटबेल ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत बिबाताई खैरनार यांचा बहुमताने विजय..!!
Next articleमहाराष्ट्र पत्रकार संघाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी मुखेडच्या यलकटवार यांची नियुक्ती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.