राजेंद्र पाटील राऊत
गरबडची निवडणूक वैरभाव विसरुन हसत खेळत साजरी! (युवा मराठा न्युज नेटवर्क) मालेगाव तालुक्यातील गरबड गावातील ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची झाली.ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर झाला. त्यात 3वार्ड 3उमेदवार निवडून आले.इतर महिला उमेदवार आधीच बिनविरोध झालेल्या होत्या. त्यात वार्ड 1मधून माजी पंचायत समिती सदस्य चिंतामण भांगरे यांनी संजय सोनवणे या उमेदवाराचा पराभव केला. वार्ड 2मधून माजी सरपंच आण्णा गुमाडे यांनी गोरख नाडेकर यांचा पराभव केला. वार्ड 3मधून भिला पेढेकर यांनी वसंत भांगरेचा पराभव केला.प्रचारकाळात उमेदवारांनी सर्व तंत्र,मार्ग वापरून प्रचार केला.आर्थिक उलाढाली झाल्या.निकाल जाहीर झाल्यावर मात्र वेगळेच चित्र मतदारांना पाहायला मिळाले.या निवडणुकीत वैरभाव वाढीस लागतो पण इथे पराभूत उमेदवारांनी विजयी उमेदवारांना फुलांचे हार आणून सत्कार केला व अभिनंदन केले. असे जगावेगळे चित्र गरबड गावाच्या ग्रामपंचायत निकालाच्या वेळी दिसून आले.