Home मुंबई 🛑 साष्ट पिंपळगाव येथील ठिय्या आंदोलनात मुंबई मराठा क्रांती मोर्चाचा सहभाग आणि...

🛑 साष्ट पिंपळगाव येथील ठिय्या आंदोलनात मुंबई मराठा क्रांती मोर्चाचा सहभाग आणि पाठिंबा 🛑

85
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 साष्ट पिंपळगाव येथील ठिय्या आंदोलनात मुंबई मराठा क्रांती मोर्चाचा सहभाग आणि पाठिंबा 🛑
✍️ जालना 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पिंपळगाव :⭕मराठा आरक्षणाची सुनावणी २५ जानेवारीपासून सुरू होणार असल्याने सदरच्या सुनावणीत मराठा आरक्षण कायद्याला दगाफटका होऊ नये व आरक्षण मिळेपर्यंत हटायचे नाही या निर्धाराने जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव येथील ग्रामस्थ आजपासून ठिय्या आंदोलनाला बसले. सदरच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी व त्यात सहभागी होण्यासाठी राज्यातून अनेक जिल्ह्यातील मराठा समन्वयक आले होते.

इतिहासातील प्रसिद्ध राक्षसभुवन येथील लढाई जेथे झाली तेथील साष्ट पिंपळगाव हे गाव मराठा आरक्षण टिकवण्यासाठी एकजुटीने पुढे सरसावल्याचे चित्र आज उभे राहिले. मोठ्या प्रमाणात गावातील महिलांनी आंदोलनात सहभाग घेतला असून तेथील गावकऱ्यांच्या हाकेला ओ देऊन महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील समन्वयक आंदोलनाची सुरुवात करण्यासाठी हजर राहिले होते. त्यासाठी

मुंबई मराठा क्रांती मोर्चातर्फे प्रमुख समन्वयक श्री. राजन घाग, श्री. प्रफुल्ल पवार, श्री. रुपेश मांजरेकर, श्री.नामदेव पवार, श्री. विजय पोळ, श्री. किशोर चव्हाण, राखीताई, श्री. माधव तांगडे त्यांच्या अनेक सहकाऱ्यांसह उपस्थित राहिले होते.

साष्ट पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी याप्रसंगी जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत सदरचे आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. या आंदोलनाचे लोण लवकरच सर्व महाराष्ट्रात पेटण्याच्या शक्यतेने आज सरकारने २५ जानेवारीला सुरू होणारी सुनावणी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केल्याचेही समजते.

या आंदोलनामुळे सरकारवर दबाव निर्माण झाल्याने सरकार आता पुढे काय पावले उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल….⭕

Previous articleगरबडची निवडणूक वैरभाव विसरुन हसत खेळत साजरी!   
Next articleनिलेवाडी येथे कलंकी केशव कमानीचे उदघाटन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here