राजेंद्र पाटील राऊत
निलेवाडी येथे कलंकी केशव कमानीचे उदघाटन
कोल्हापूर : निलेवाडी ता. हातकणंगले येथे दहाव्या अवताराचे तिर्थक्षेत्र असलेल्या कलंकी केशव मंदीराच्या प्रांगणात केलेल्या कमानीच्या उदघाटनाचा कार्यक्रम पार पडला. सदरची कमान श्री. शंकर बाळकृष्ण फाटक रा. शिरसी ता. शिराळा यांनी त्यांचे वडील बाळकृष्ण केदारी फाटक यांचे समरणार्थ वैक्तिक खर्चातून हि कमान बांधून दिली आहे. गेले अनेक वर्षे हा विषय प्रलंबित होता परंतु श्री शंकर फाटक यांनी स्वखर्चातून हि कमान बांधून दिली त्यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे . यावेळी सौ. पुष्पा आळतेकर जिल्हा परिषद सदस्य यांच्या फंडातून मंदिर परिसरात बसवण्यात आलेल्या पेव्हिंग ब्लॉक चे सुद्धा उदघाटन केले यावेळी गोरखनाथ महाराज सुशीलनाथ महाराज , भानुदास महाराज व सौ. वर्षा माने सरपंच निलेवाडी , तानाजी जाधव उपसरपंच निलेवाडी श्री. केशव जाधव माजी. उपसरपंच व इंजनिअर अमरदीप कोरेगावकार यासह कलंकी केशव भक्त सांप्रदायातिला कोल्हापूर सांगली मुंबई या परिसरातील संत व गावातील भक्त मंडळी व ग्रामस्थ उपस्तीत होते.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .