• Home
  • एवढी संवेदनशील माहिती अर्णब यांना कळालीच कशी ? ; ग्रहराज्यमंत्री अनिल देशमुख

एवढी संवेदनशील माहिती अर्णब यांना कळालीच कशी ? ; ग्रहराज्यमंत्री अनिल देशमुख

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210119-WA0155.jpg

एवढी संवेदनशील माहिती अर्णब यांना कळालीच कशी ? ; ग्रहराज्यमंत्री अनिल देशमुख

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

मुंबई, दि.२० – रिपब्लिक टिव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी अध्यक्ष पार्थ दासगुप्ता यांच्यात झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटचे प्रकरण आता अधिकच तापणार असल्याचं दिसत आहे.
बालाकोट येथील हल्ल्या बाबतची माहिती अर्णब यांना अगोदर पासून होती,
एवढी संवेदनशील माहिती अर्णब यांना कळालीच कशी ?
असा प्रश्न राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
तसेच, याप्रकरणी कॅबिनेटची बैठक देखील बोलावण्यात आली असून, त्यानंतर निर्णय घेतला जाणार असल्याचंही देशमुख यांना सांगितलं आहे.
अर्णबच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्यात यावी अशी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी असून
अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हायरल झालेल्या संभाषणाची आम्ही संपूर्ण माहिती मिळवत आहोत.
त्यात काही बालाकोट एअर स्ट्राईक व पुलवामा हल्ल्या सारख्या संवेदशनील बाबींचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
असेही अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.
या अगोदर या व्हॉट्सअॅप चॅटची संयुक्त संसदीय समितीकडून (जे.पी.सी.) चौकशी करा, अशी मागणी काँग्रेसने केंद्र सरकारकडे केलेली आहे.
“गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील चॅटिंग याचा पुरावा आहे की, भा.ज.पा.च्या कार्यकाळात झालेला बालाकोट एअर स्ट्राइक लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आला होता.
हा ड्रामा उघड करण्यासाठी काँग्रेस लवकरच मोठी पत्रकार परिषद घेणार असून याप्रकरणी गंभीरपणे चौकशीची मागणी करणार आहे.
”असं काँग्रेसकडून सांगण्यात आलेलं असल्याचेही समजते.

anews Banner

Leave A Comment