राजेंद्र पाटील राऊत
सडक सुरक्षा – जीवन रक्षा
रस्ता सुरक्षा अभियान 2021 पालघर,(वैभव पाटील युवा मराठा न्युज नेटवर्क)-
दि.18 / जानेवारी/ 20 21 ते दि. 17 /फेब्रुवारी/20 21 या कालावधीत यशस्वीपणे राबविण्या साठी उद्घाटन समारंभ आज रोजी 11:30 वा. सुरू सुरु होऊन 14.30 वा. पार पडला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मा. आमदार श्रीनिवास वनगा , पालघर विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य ,यांचे शुभ हस्ते उद्घाटन होऊन सदर कार्यक्रमास मा. श्री अमित घोडा, माजी आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, मा. श्री संदीप भागडीकर सा. पोलीस उपाधीक्षक , मा. श्री मनोजकुमार म्हात्रे सा. पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस,ठाणे विभाग , तसेच विभागातील स्थानिक, प्रतिष्ठित नागरिक ,मोटार वाहन चालक तसेच आयआरबी,क्रेन, ॲम्बुलन्स चे कर्मचारी,पत्रकार असे एकूण 250 ते 300 समुदाय उपस्थित होता मान्यवरांनी तसेच माननीय वरिष्ठांनी रस्ते सुरक्षा अभियान संदर्भात उपस्थित समुदायाला मार्गदर्शन केले व कोणत्या दक्षता घेतल्यास नागरिकांना सुरक्षा प्राप्त होईल याबाबत मार्गदर्शन केले. आम्ही कसूरदार वाहनावर मोटार वाहन कायद्याखाली सन 2019 मध्ये दाखला केसेस 22277 असल्याचे व 2020 मध्ये 42785 केसेस जवळ पास दुपटीने दाखल केल्याचे सांगून 2019 चे दाखल अपघात 158 व 2020 मध्ये दाखला अपघात107 झाल्याचे व अपघाताचे प्रमाण 33 टक्क्याने कमी केल्याचे सांगून आताही अविरतपणे वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या कसूरदार वाहन चालकावर महामार्ग पोलीस केंद्र चारोटी ची कारवाई प्रभावीपणे चालू असल्याच्या सांगून अपघातात मदत करणारे यांचा यथोचित सत्कार केला अपघाताची वेडी तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तींचे प्रथम प्राधान्य अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव वाचविने व त्यांना लवकरात लवकर वैद्यकीय उपचार मिळवून देणे हे असले पाहिजे ते करण्यास कोणताही कायदेशीर अडथळा संभवत नाही सुप्रीम कोर्टाने अभय दिले आहे असे सांगून पुढील एक महिना रस्ता सुरक्षा अभियान प्रभावीपणे राबवित असल्याचे सांगून सदर कार्यक्रमाची माहिती प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीस दिली आहे.