Home माझं गाव माझं गा-हाणं यशवंतनगरला मतदाना दरम्यान घडला अघोरी जादू टोण्याचा प्रकार लोकशाही क्रुर थट्टा,अंधश्रध्दा निर्मुलन...

यशवंतनगरला मतदाना दरम्यान घडला अघोरी जादू टोण्याचा प्रकार लोकशाही क्रुर थट्टा,अंधश्रध्दा निर्मुलन समितीला आव्हान…!!

123
0

राजेंद्र पाटील राऊत

यशवंतनगरला मतदाना दरम्यान घडला अघोरी जादू टोण्याचा प्रकार
लोकशाही क्रुर थट्टा,अंधश्रध्दा निर्मुलन समितीला आव्हान…!!
(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव- आज सर्वत्र ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी मतदान प्रक्रीया पार पडत असतानाच, एका अघोरी भगतांच्या कारनाम्यामुळे सटाणा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
आज यशवंतनगर ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडत असताना दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान चारचाकी वाहनातून आलेल्या भोंदू भगतांनी मतदान केंद्राच्या परिसरात अघोरी जादू टोणा करण्यास सुरुवात केल्याने नागरिकात एकच घबराट निर्माण झाली.आणि या अघोरी भोंदू भगतांनी केलेल्या पुजा अर्चमुळे इ.व्ही,एम दोन मशिन बंद पडल्याने नागरिकात अजूनच भितीचे वातावरण निर्माण झाले होते,
दरम्यान या भोंदू भगतांना गावातीलच एका पँनलप्रमुखाने आमंत्रीत केले होते अशी यशवंतनगर गावात चर्चा आहे,तर भोंदू भगताचे चारचाकी वाहन गावक-यांनी ताब्यात घेतले आहे,मात्र या लोकशाहीचे धिंडवडे काढणा-या भोंदू भगतांविरुध्द सटाणा पोलिसात गुन्हा दाखल झाला किंवा नाही याबाबत माहिती प्राप्त होऊ शकली नाही,आणि दिवसाढवळ्या कायद्याचे उल्लंघन करुन अंधश्रध्दा वाढीचा खुलेआम प्रकार करणाऱ्या या भोंदू भगतांनी एका अर्थाने अंधश्रध्दा निर्मुलन समितीलाच खुले आव्हान दिले आहे,सटाणा पोलिस याप्रकरणी काय कारवाई याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Previous article🛑 सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑
Next articleशाळांची घंटा वाजणार,या तारखेपासून राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here