Home Breaking News मालेगांवची आदर्श पंचायत समिती श्वानाचा सुळसुळाट कर्मचारी त्रस्त

मालेगांवची आदर्श पंचायत समिती श्वानाचा सुळसुळाट कर्मचारी त्रस्त

118
0

मालेगांवची आदर्श पंचायत समिती
श्वानाचा सुळसुळाट कर्मचारी त्रस्त
पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ..!
राजेंद्र पाटील राऊत
मालेगांव- नाशिकच्या मालेगाव तालुक्यासाठी असलेल्या अतिप्रशस्त अशा आदर्श तालुका पंचायत समितीचे कर्मचारी सध्या एका वेगळ्याच समस्येने त्रस्त झालेले आहेत .
मालेगांव पंचायत समितीच्या आवारात कुठलाच पायपोस व धरबंधन नसल्याने एक पिसाळलेले श्वान (कुत्रे)मोकाटपणे पंचायत समितीच्या इमारतीत शिरकाव करीत असल्याने त्याची धास्ती घेऊन कर्मचाऱ्यांनी गेटवरच आडोसा लावून घेतल्याने कुत्र्यापासून वाचण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला आहे.
तर एका अधिकाऱ्यांने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की,हे पिसाळलेले कुत्रे रात्रभर ग्रामपंचायत विभागाच्या कार्यालयातच तळ ठोकून मुक्कामाला होते.
मालेगाव पंचायत समितीत कामकाजासाठी तालुक्यातून अनेक लोक येत असतात.मात्र पंचायत समितीच्या इमारतीतच असलेल्या पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांचे या प्रकरणाकडे दुर्लक्ष झालेले आहे.त्यामुळे एखादी श्वानदंश होण्याच्या घटनेची वाट संबंधित बघत आहेत का?असा सवाल उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here