Home विदर्भ दादासाहेब कन्नमवार जयंती सोहळ्याचे आयोजन 📌विधानभवन प्रांगणात कार्यक्रम

दादासाहेब कन्नमवार जयंती सोहळ्याचे आयोजन 📌विधानभवन प्रांगणात कार्यक्रम

162
0

राजेंद्र पाटील राऊत

दादासाहेब कन्नमवार जयंती सोहळ्याचे आयोजन
📌विधानभवन प्रांगणात कार्यक्रम                                        (युवा मराठा न्युज नेटवर्क)

नागपूर – बहुजन नायक, स्वातंत्र्य संग्राम सैनिक व माजी मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची १२१ वी जयंती नागपूर विधानभवन प्रांगणात रविवारी (ता. १०) सकाळी १० वाजता साजरी होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री डॉ नितीन राऊत, क्रीडा मंत्री सुनील केदार, बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार प्रकाश गजभिये, प्रवीण कुंटे उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे व कन्नमवार प्रेमींच्या उपस्थितीत विधानभवन प्रांगणात असलेल्या दादासाहेब कन्नमवार यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कन्नमवार दिनदर्शिका २०२१ चे विमोचन करण्यात येणार आहे. तसेच कन्नमवारांच्या विचारधारेला सोबत घेऊन चालणा-या समाज, दिव्यांग, समाजकारण, पत्रकारिता व कला क्षेत्रातील पाच समाजव्रतींचा सत्कार करण्यात येणार आहे. तदनंतर कार्यक्रम स्थळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन बेलदार समाज संघर्ष समिती व कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार प्रसार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक राजेंद्र बढिये, मुकुंद अडेवार, खिमेश बढिये, विनोद आकुलवार, मिलिंद वानखेडे, दिनानाथ वाघमारे, राजू चव्हाण, किशोर सायगन, विनायक सुर्यवंशी व समितीतर्फे करण्यात आले आहे

Previous articleकळवाडी गावात प्रशासनाच्या दक्षतेमुळे तणाव होता -होता टळला
Next articleनांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या संदर्भात पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here