• Home
  • आदरणीय कै. मधुकररावजी पाटील खतगावकर यांचे निधन..

आदरणीय कै. मधुकररावजी पाटील खतगावकर यांचे निधन..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210106-WA0047.jpg

आदरणीय कै. मधुकररावजी पाटील खतगावकर यांचे निधन..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आदरणीय कै. मधुकररावजी पाटील खतगावकर यांची अल्पशा आजाराने हैदराबाद येथे उपचार सुरु असताना देवाज्ञा झाली आहे तरी त्यांच्या अंत्यविधी चा कार्यक्रम दि 6/01/2021 वार बुधवार रोजी सायंकाळी 4 वा त्यांच्या राहत्या गावी खतगांव ता बिलोली येते करण्यात येणार आहे…मा खा भास्करराव जी पाटील खतगावकर यांचे वडील बंधू होते
राजकीय,सामाजिक, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील नामवंत व्यक्तीमत्त्व असलेले तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष, नांदेड जि प माजी कृषी सभापती, गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना शंकरनगर चे माजी चेअरमन, नरसिंह सहकारी सूत गिरणी खानापूर चे माजी चेअरमन,गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्ट शंकरनगर चे उपाध्यक्ष तथा माजी सचिव,श्री साई शिक्षन प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड चे सदस्य तसेच कृषिरत्न,ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आदरणीय कै मधुकरराव जी पाटील खतगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
शोकाकुल-खतगावकर परिवार व समस्त गावकरी मंडळी
अंत्यविधी-मौजे खतगाव ता.बिलोली जि. नांदेड
वेळ-सायंकाळी चार(4) वा
स्थळ-सौ. मंजुळाबाई ज्यु.कॉलेज प्रांगण खतगाव

anews Banner

Leave A Comment