• Home
  • नांदेड पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यांची आत्महत्या   

नांदेड पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यांची आत्महत्या   

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201223-WA0058.jpg

नांदेड पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यांची आत्महत्या     देगलूर ,(संजय कोकेंवार तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-          पोलीस दलातील ज्ञानेश्वर शिवदास वडजे, या पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे अद्यापही समजले नाही. पोलीस मुख्यालय नांदेड येथे ते कर्तव्यावर रुजू होते.त्यांचे मूळ गाव कंधार तालुक्यातील अंबुलगा हे असून त्यांच्या पश्चात एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. पोलीस दलात 1991 साली ते रुजू झाले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

anews Banner

Leave A Comment