राजेंद्र पाटील राऊत
डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वडगांव शहरात औषध फवारणी
विजयसिंह यादव प्रतिष्ठाण वडगांव शहरातील नागरिकांच्या हितासाठी नेहमीच अग्रेसर,
पेठ वडगांव : स्वच्छ सर्वेक्षणमधे देशात ११वा व राज्यात ९वा क्रमांक आलेल्या वडगांव नगरपालिच्या, शहरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असुन नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष , कोरोना सारख्या महामारी संकटावेळी उत्कृष्टरित्या मोलाचे कार्य करून , पुन्हा एकदा वडगांव शहरातील नागरिकांच्या आरोग्याची हितासाठी विजयसिंह यादव प्रतिष्ठाण पुन्हा एकदा धावून आले आहे , विजयसिंह यादव प्रतिष्ठाण सामाजिक बांधिलकी जपत शहरात वाढत असलेला डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विजयसिंह यादव प्रतिष्ठाणच्या वतीने वडगांव शहरातील गांजवे बोळ, विवेकानंद पथ, बिरदेव चौक, भोपळे गल्ली, बुरुड गल्ली, डॉ.बेले दवाखाना परिसर, गुजर बस्ती, लोळगे बोळ, डाँ.मोमीन दवाखाना परिसर, जैन बस्ती, वडगावे बोळ, वाडा परिसर, चावडी ,
ठाणेकर चौक, घुमट गल्ली ,वाणी पेठ, गणपते बोळ, माळी गल्ली, तारळेकर गल्ली, भजनी गल्ली, कैकाडी गल्ली, बिरदेव मंदिर परिसर इत्यादी ठिकाणी फोगिंग मशीनच्या साह्याने डासांची औषध फवारणी करण्याचे काम विजयसिंह यादव प्रतिष्ठाण यांच्या वतीने संपूर्ण वडगांव शहरातील सर्वच प्रभागामधे सुरू आहे , तसेच वडगांव शहरातील नागरिकांनी वयोवृद्ध व लहान मुलांची काळजी घेण्याचे आव्हान विजयसिंह यादव प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .