Home आंतरराष्ट्रीय व्हॉट्सॲप पेमेंट्स आता उपलब्ध : UPI मार्फत व्हॉट्सॲपवरूनच पाठवा पैसे!

व्हॉट्सॲप पेमेंट्स आता उपलब्ध : UPI मार्फत व्हॉट्सॲपवरूनच पाठवा पैसे!

138
0

राजेंद्र पाटील राऊत

व्हॉट्सॲप पेमेंट्स आता उपलब्ध : UPI मार्फत व्हॉट्सॲपवरूनच पाठवा पैसे!

( युवा मराठा न्युज नेटवर्क)
प्रथम ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याच्या चॅटवर जा.
आता आपण नेहमी फोटो पाठवत असताना जे अटॅच बटन (📎) टच करतो त्यावर स्पर्श करा.
आता तुम्हाला कॅमेरा, गॅलरी, ऑडिओ, डॉक्युमेंट, लोकेशन, कॉनटॅक्ट सोबत नवा Payment पर्याय आलेला दिसेल. (जर दिसत नसेल तर व्हॉट्सॲप प्ले स्टोअरवरून अपडेट करून घ्या)
त्यावर क्लिक करून ACCEPT AND CONTINUE वर स्पर्श करा.
आता तुमची बँक निवडा.
आता तुमचं बँक अकाऊंट आणि क्रमांक तपासण्यासाठी Verification SMS येईल. ही प्रक्रिया आपोआप पूर्ण होईल.
हे तुम्हाला तुम्ही पैसे पाठवत असणाऱ्या व्यक्तीला एकदाच करावं लागेल. हा सेटप तुम्ही दोघांनी केला असेल तरच ही सोय वापरता येईल.
जर समोरच्या व्यक्तीने सेटप केला नसेल तर Notify पर्याय दिसेल त्याद्वारे त्यांना सेटप करण्यास सांगू शकता.
आता तुम्ही Send Payment पर्याय वापरुन फोनपे गूगल पे प्रमाणेच रक्कम टाकून UPI पिन टाइप करून पैसे पाठवू शकता .
याद्वारे केलेले व्यवहार मेसेजेसमध्ये व एका यादीद्वारेही पाहू शकाल.

Previous articleउदगीर देगलूर महामार्गावर रस्त्याच्या कडेला ट्रक उलटला..
Next articleमालेगांवात वनश्री पुरस्काराचा सन्मान सोहळा उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here