• Home
  • ग्रामपंचायत निवडणुकीत स्वयंघोषणापत्रावर कागदपत्रे घ्या. राज्य ग्रामसेवक युनियनची एका निवेदनाद्वारे मागणी..

ग्रामपंचायत निवडणुकीत स्वयंघोषणापत्रावर कागदपत्रे घ्या. राज्य ग्रामसेवक युनियनची एका निवेदनाद्वारे मागणी..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201220-WA0027.jpg

ग्रामपंचायत निवडणुकीत स्वयंघोषणापत्रावर कागदपत्रे घ्या. राज्य ग्रामसेवक युनियनची एका निवेदनाद्वारे मागणी..

मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवारांना लागणारी कागदपत्रा पैकी ग्रामसेवकांनी उमेदवारांना बेबाकी प्रमाणपत्र द्यावे व इतर कोणतेही दाखले हे स्वयंघोषणापत्र देण्याचे निवडणूक विभागाने शासन नियमाप्रमाणे सुचवावे. अशी मागणी तहसीलदार काशिनाथ पाटील यांच्या कडे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने दिनांक 17 डिसेंबर 2020 रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे. मुखेड तालुक्यात 109 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार शासकीय कागदपत्रे जमवा-जमव करण्यासाठी ग्रामसेवकाकडे धावपळ करीत आहेत या निवडणुकी साठी लागणारी कागदपत्रे ग्रामपंचायतीचे अपत्य प्रमाणपत्र मालमत्ताकर नळपट्टी घरपट्टी भरणा करून त्याची बेबाकी प्रमाणपत्र निवडणुकीत उमेदवारांना दाखला देणे बंधनकारक आहे. त्यामुळे ग्रामसेवक यांनी उमेदवाराकडून ग्रामपंचायत येणे बाकी वसूल करून बेबाकी प्रमाणपत्र शिवाय इतर कुठलेही कागदपत्रे देऊ नये असे आवाहन ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.त्याचबरोबर वरील मागण्या बाबतीत आपल्या स्तरावरून उमेदवारांना सुचवावे व ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी यांना अवगत करावे. अशी मागणी ग्रामपंचायत संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे यावेळी सचिन पाटील बी. डी .पाटील सय्यद नजीर पांडुरंग नागेश्वर संजय जाधव होनवडज कर प्रवीण बारमाळे माधव शिंदे सिद्धेश्वर खळभांडे गजानन मामिलवाड जि.डी. शिंदे पंदीलवार हाळदेवाड चंद्रकांत देशमुख एस. एम. भवर एस. जे. सोनकांबळे एम .डी .देवकांबळे आदी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment