Home Breaking News अप्पर जिल्हापोलिस प्रमुख जयश्री गायकवाड यांची व्हि.पी.एल स्पर्धेला धावती भेट

अप्पर जिल्हापोलिस प्रमुख जयश्री गायकवाड यांची व्हि.पी.एल स्पर्धेला धावती भेट

156
0

 

पेठ वडगांव : शहरात सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या पावनभूमीत वडगांव शहरात वडगांव प्रथमच आय.पी.एल.नंतर व्हि. पी.एल.भव्य असा वडगांव ” प्रिमीयर लिग 2020 ” हे ऐतिहासिक पर्व (क्रिकेट स्पर्धा ) छत्रपती शाहू स्टेडिअम नागोबावाडी (वडगांव) येथे सुरू आहे. या स्पर्धेच्या ठिकाणी आत्ता पर्यंत नेते मंडळी भेट देऊन गेले.
आज सातव्या दिवशी सेमीफायनलच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी अप्पर जिल्हापोलीस प्रमुख जयश्री गायकवाड आल्या होत्या. त्यांचे स्वागत संतोष माळी( बंडा )यांनी केले .  सर्वप्रथम त्यांनी या व्ही.पी.एल स्पर्धा हा अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे असे यावेळी त्या म्हणाल्या, आपल्या आयुष्यामध्ये खेळ हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असेल तरच आपण कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचू शकतो आणि या स्पर्धेचे आयोजन अतिशय चांगल्या प्रकारे केल्याबद्दल सर्व आयोजकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे .
स्पर्धा आहे तिथे विजय आणि पराजयही आहे तर वडगाव प्रीमियर लीगमध्ये आठही संघ व संघमालक असतील त्यांना एक विनंती केली विजय झालेला संघ असेल त्याने पराजय संघाला कुठेही दुखावले जाणार नाही याचे दक्षता घेण्याची गरज आहे या सांघिक भावनेने ज्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत , त्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेला आहात , त्यामध्ये स्पर्धा आयोजित करण्याची जी भूमिका आहे किंवा भावना आहे त्याला कुठेही गालबोट लागणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी. आणि हि स्पर्धा उत्कृष्टरित्या , चांगल्याप्रकारे वाद विवाद नकरता पार पाडव्यात
असे आवाहन  यावेळी अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख जयश्री गायकवाड यावेळी केले.
या प्रसंगी शाहू शिक्षण संस्थेचे कार्यवाहक श्री.अभिजीत गायकवाड , शिवसेनेचे उपशहर प्रमुख श्री.सुनिल माने , अनिल माने , युवा सेनेचे अक्षय मदने , ग्राहक सेनेचे मनोज जाधव इत्यादी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते , तसेच अमर जयसिंग पाटील , युवा मराठा चे संपादक मोहन शिंदे , अनिल म्हेत्तर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here