Home Breaking News विजयसिंह यादव प्रतिष्ठान अध्यक्षा , सौ.विद्याताई पोळ यांना कोविड योद्दा पुरस्कार

विजयसिंह यादव प्रतिष्ठान अध्यक्षा , सौ.विद्याताई पोळ यांना कोविड योद्दा पुरस्कार

152
0

 

कोल्हापूर : पेठ वडगांव शहरातील विजयसिंह यादव प्रतिष्ठान अध्यक्षा व माजी. नगराध्यक्ष सौ विद्या पोळ ,
विद्यमान नगरसेविका वडगांव नगर परिषद यांना युवा मराठा न्यूज चॅनेलचा कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान .
“जिथे दान देण्याची सवय असते”
“तिथे संपत्तीची कमी नसते ”
आणि “जिथे माणुसकिची शिकवण असते ”
“तिथे माणसांची कमी नसते”
समाजकार्य असो किंवा धार्मिक कार्य वडगांवची लेक नेहमीच एक पाऊल पुढे असते.
पेट वडगांव शहरामध्ये कोरोना महामारी च्या संकटावेळी सामाजिक कार्यातून विजयसिंह यादव प्रतिष्ठान अंतर्गत संपूर्ण पेठ वडगांव शहरामध्ये औषध फवारणी , गरजूंना जीवनावश्यक वस्तू औषध वाटप , वडगांव कोविड सेंटरमधील रुग्णांना , डाँक्टर , व कोविड सेंटर स्टाफ यांना नाष्टा व जेवणाची सोय या माध्यमातून कोरोना महामारी संकटावेळी अत्यंत धैर्याने व धाडसी कामगिरी बजावली असल्याने आपल्या या सामाजिक कार्यची दखल घेऊन युवा मराठा न्यूज चँनेल मालेगांव जिल्हा नाशिक ,मुख्य संपादक श्री.राजेंद्र पाटील (राऊत ) यांच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान . हा पुरस्कार श्री.मोहन शिंदे कार्यकारी संपादक युवा मराठा ,श्री.रघुनाथ पिसे उपसंपादक युवा मराठा हातकणंगले तालुका आवृत्ती , पेठ वडगांव यांच्या हस्ते देण्यात आला.

युवा मराठा न्यूज नेटवर्क,कोल्हापूर.

 

Previous articleविना मास्क प्रवाशांना ‘आपली बस’मध्ये प्रवेश नाही परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांचे निर्देश
Next articleप्रहार दिव्यांग क्रांती संघटना देगलूरच्या वतीने निवेदन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here