Home Breaking News घुंगराळा येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा स्थापन करण्याची वसंत सुगावे पाटील यांची अर्थमंत्री...

घुंगराळा येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा स्थापन करण्याची वसंत सुगावे पाटील यांची अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

196
0

घुंगराळा येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा स्थापन करण्याची वसंत सुगावे पाटील यांची अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

नांदेड, दि.१२ – राजेश एन भांगे

नायगाव तालुक्यातील घुंगराळा हे गाव नांदेड हैद्राबाद राज्य महामार्गावरील गाव असुन या गावाशी आजुबाजुच्या पंधरा गावांतील शेतकरी,व नागरिक यांचा रोजचा संपर्क आहे त्यामुळे याठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेची आवश्यकता असून याच करिता घुंगराळा या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा स्थापन करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे केली आहे.
घुंगराळा येथे बँक स्थापन क केल्यास आजुबाजुच्या वंजरवाडी, रुई, सावरखेड, गंगणबीड, रानसुगाव,ताकबीड, निळेगव्हाण, आंतरगाव , देगाव, हिप्परगा, ईज्जतगाव या गावातील शेतकरी व नागरिकांना याचा फ़ायदा होईल व बँकेचे व्यवहार करण्यास सोईस्कर होईल अशी घुंगराळ्या सह ईतर गावातील नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे घुंगराळा येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा स्थापना करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here