Home विदर्भ बी पी एल चा दाखला ग्रामपंचायत स्तरावर मिळणार आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या...

बी पी एल चा दाखला ग्रामपंचायत स्तरावर मिळणार आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पाठपुराव्याची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली दखल

104
0

राजेंद्र पाटील राऊत

बी पी एल चा दाखला ग्रामपंचायत स्तरावर मिळणार

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पाठपुराव्याची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली दखल

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारिद्रय रेषेखालील कुटुंब आहेत. यापूर्वी तालुका स्तरावरील पंचायत समिती मधून मिळत होते. त्यामुळे दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. समाजातील बी. पी. एल मध्ये असणाऱ्या घटकाला होणार त्रास अधिक होत होता. छोट्या कागदपत्रांच्या पूर्ततेकरिता त्यांना तालुक्यातील पंचायत समिती मधील अधिकाऱ्याच्या मागे चकरा माराव्या लागत होत्या. हि पायपीट बंद करून बी. पी. एल चा दाखला ग्रामपंचायत स्तरातून देण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. त्यांनी या मागणीची दखल घेत ७ डिसेंबर २०२० रोजी अधिसूचना काढून हि मागणी मान्य केली.
दारिद्र्य रेषेखालील लोकांना उदरनिर्वाह हा त्यांच्या दैनंदिन रोजगारावर अवलंबून असतो. हातावर आणून पानावर खाणारा हा वर्ग आहे.बी. पी. एल चा दाखल मिळविण्याकरिता रोजगार बुडवून ग्रामीण भागातून तालुक्यातील पंचायत समिती येथे जावे लागते. पंचायत समिती येथे अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसल्यास त्याला बी. पी. एल चा दाखला मिळविण्याकरिता वारंवार चकरा माराव्या लागतात. यामध्ये त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे बी. पी. येत चा दाखल हा पंचायत समिती मार्फत न देता ग्रामपंचायत मार्फत दिल्यास बी. पी. एल चा धारकांना होणार त्रास बंद होईल.
त्यामुळे पूर्वी प्रमाणे बी. पी. एल चा दाखला ग्रामपंचायत स्तरातून देण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत हा निर्णय हा निर्णय घेण्यात आला.
समाजाच्या शेवटच्या घटकाला त्रास होऊ नये. महिलांवर होणारे अत्याचार बंद करण्याकरिता कडक कायदे, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा. याकरिता आमदार प्रतिभाताई धानोरकर नेहमी आग्रही राहिल्या आहेत. या त्यांच्या पाठपुराव्यामुळे आता बी. पी. एल धारकांची पायपीट बंद होणार आहे. समोर देखील अविरत समाजाच्या शेवटच्या वर्गासाठी काम करत राहू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. या निर्णयाचे सर्वच स्थरातून स्वागत करण्यात येत आहे.     युवा मराठा न्युज नेटवर्क चंद्रपूर 

Previous articleशहर बस नागपूर ‘मेट्रो’ला कनेक्ट
Next articleघुंगराळा येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा स्थापन करण्याची वसंत सुगावे पाटील यांची अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here