राजेंद्र पाटील राऊत
कोल्हापूर मधे व्यापाऱ्यांचा
भारत बंदला उत्फुर्त पाठींबा
कोल्हापूर सह ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांचा भारत बंदला पाठिंबा
कोल्हापूर : कोल्हापूर मधील सर्वच व्यापाऱ्यानी उत्फुर्त पाठिंबा दिला
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात देखील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.
शिवसेनेने शहरातून रॅली काढून केंद्राचा निषेध नोंदवला सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ऐतिहासिक बिंदू चौकात एकत्रीत येत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वाभाडे काढले.
स्वाभिमानी संघटनेने शिरोळमध्ये कृषी विधेयकांची होळी केली.
केंद्र सरकारने तीन कृषी विधेयक अंमलात आणल्याने त्याविरोधात पंजाब, हरियाणा येथील शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरु केले आहे. त्याला पाठींबा देण्यासाठी देशातील राजकीय पक्षांनी भारत बंदची हाक दिली होती. कोल्हापूरात त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील व्यापाऱ्यांनी आपले सर्वच व्यवहार बंद ठेवून भारत बंदमध्ये सहभाग घेतला.
हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरातील व्यापाऱ्यांनी सर्वच व्यवहार (मेडिकल स्टोअर्स वगळून )बंद ठेवून भारत बंदला उत्फुर्तपणे पाठिंबा दिला.
कोल्हापूर शहरातील व्यापाऱ्यांनीही पाठींबा दिला. राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी इत्यादी बाजारपेठेतील दुकाने दिवसभर बंद होती. औषध, पेट्रोलपंप वगळता इतर सगळे व्यवहार ठप्प होते. शहरातील रस्त्यांवर वर्दळ होती.
कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, माकप, भाकप, शेकाप यासह वीस राजकीय पक्षांनी एकत्रीत केंद्र सरकारचा निषेध केला. बिंदू चौकात एकत्रित येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर आसूड ओढले. स्वाभिमानी चे नेते राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, शेतकरी एकदा अशांत झाला तर कोणालाही राज्यकारभार करता येणार नाही.
कोल्हापूर बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी भाजी पाला व गूळाचे सौदे बंद केले होते. तसेच शहरातील कपिलतीर्थ, गंगावेश येथील भाजीमंडई ओस पडल्या होत्या. बाजार समितीमध्ये भाजीपाला, फळे, गुळाची आवक न झाल्याने तिथे सुमारे साडे तीन कोटीची उलाढाल ठप्प झाली. दूधाचे संकलन सुरू असले तरी त्यावरही परिणाम झाला आहे. छोटीमोठी दुकाने बंद राहिल्याने कोट्यावधीची उलाढाल थांबली.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .