राजेंद्र पाटील राऊत
*तलाठी भरतीकरीता मराठा उमेदवारांचा मार्ग मोकळा*
महाविकास आघाडी सरकारनं ७ जिल्ह्यांमधील तलाठी पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा केलाय. त्यामुळे लवकरच या पदांसाठी निवडल्या गेलेल्या उमेदवारांना नोकरीत रुजू करून घेतलं जाणार आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही घोषणा केलीय.
मराठा आरक्षणाला सध्या सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिलीय. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारनं प्रवेश प्रक्रिया आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यायला सुरुवात केली आहे.
महाविकास आघाडी सरकारनं ७ जिल्ह्यांमधील तलाठी पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा केलाय. त्यामुळे लवकरच या पदांसाठी निवडल्या गेलेल्या उमेदवारांना नोकरीत रुजू करून घेतलं जाणार आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही घोषणा केलीय.
बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर या सात जिल्ह्यांतील तलाठी भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, असं थोरात यांनी म्हटलंय. मराठा उमेदवारांना एसईबीसी श्रेणीतून प्रवेश दिला जाईल, तर इतर आरक्षणांचा विचार करून इतर उमेदवारांच्या भरतीची प्रक्रियादेखील पार पाडली जाणार आहे.
यापूर्वी २६ जिल्ह्यांतील तलाठी पदाची भर्ती प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ७ जिल्ह्यांतील प्रक्रिया थांबवण्यात आली होती. अहमदनगरमधील १० उमेदवार हे बोगस असल्याचा आरोपदेखील होत होता. या दहा जणांना वगळून इतर प्रक्रिया आता सुरू होणार आहे.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .