ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकाचे पिक धोक्यात..मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार,(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यात वातावरणातील बदल व ढगाळ वातावरणामुळे तूर हरभरा ज्वारी गहू भाजीपाल्यांच्या करडी अशा अनेक पिकावर रोगांचा प्रार्दुभाव होत आहे ढगाळ वातावरणात हरभरा करपून जात आहे भारलेल्या तुरीच्या पिकाचे प्रचंड नुस्कान होत आहे पिके वाचवण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे यावर्षी प्रतीवर व अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकाची रास करता आली नाही याकाळात अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतात पाणी साचले होते शेतात जास्त प्रमाणात ओलावा असल्याने रब्बी साठी लवकर करता आली नाही पावसामुळे शेतात झालेले गवत काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पदरमोड करावी लागली शेतकरी आणि शेतातील साफसफाई करून हरभरा गहू ज्वारी पिकाची लागवड केली पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे तुरीचे पिक चांगले आले होते परंतु ढगाळ वातावरणामुळे त्यांचा फटका बसला आहे किडीचे प्रमाण वाढले असून तुरीचे फुले गळून पडत आहेत मशागतीनंतर रब्बीची पेरणी झाली शेतातील असलेल्या हरभरा तूर हे पिके अक्षरश करपून जात आहेत या वर्षाच्या परतीच्या पावसामुळे खरीप पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा रब्बी पिकांवर होत्या परंतु सुरु असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पडलेल्या रोगामुळे हाती काही पडते की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे