Home मुंबई एसटी.महामंडळाच्या च्या ३०० कर्मचाऱ्यांवर कारवाई

एसटी.महामंडळाच्या च्या ३०० कर्मचाऱ्यांवर कारवाई

92
0

राजेंद्र पाटील राऊत

एसटी.महामंडळाच्या च्या ३०० कर्मचाऱ्यांवर कारवाई

मुुंबई :महाराष्ट्र राज्यातुन मुंबईत बेस्ट सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बससह चालक-वाहकांना प्रवाशांच्या वाहतुकीच्या सेवेसाठी पाठविले जात आहे. मात्र, कोरोनाची भीती व अन्य कारणांमुळे दांड्या मारणाऱ्या आतापर्यंत ३०० चालक-वाहकांना महागात पडले. यापैकी काही कर्मचाऱ्यांचे निलंबन तर काही जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.एसटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईत लोकल सुरू असली तरी काही निकषांमुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. परिणामी, बेस्टची वाहतूक सेवा अपुरी पडत असल्याने बेस्ट व परिवहन महामंडळात करार झाला असून, त्यानुसार राज्यातील अनेक बससह चालक-वाहक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर आदी जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांना मुंबईत पाठविले आहे. मात्र कोरोनाचे कारण देत अनेक वाहक, चालक कामावर येण्यास टाळाटाळ करतात. त्यांच्यावर निलंबन आणि कारवाई करण्यात आली. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातूनही प्रत्येक आगारातून दहा दिवसांसाठी ४० ते ४५ जणांची टीम आलटूनपालटून मुंबईला ड्युटीसाठी पाठविली जाते. मात्र कोरोनाची भीती व अन्य कारणांमुळे दांड्या मारणाऱ्या आतापर्यंत १०० हून अधिक जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क.

Previous articleमाहे एप्रिल ते जून 2020 या कालावधीतील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका व मतदार यादीचा कार्यक्रम रद्द.
Next articleराज्यभर धुराळा उड़नार, नव्याने जाहीर होणार ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here