Home Breaking News इचलकरंजी शहरात इ.ना.म.ची नदी वाचवा मोहीम.

इचलकरंजी शहरात इ.ना.म.ची नदी वाचवा मोहीम.

212
0

 

निर्माल्य नदीत टाकण्यापासून परावृत्त करण्यासाठी आज इचलकरंजी नागरिक मंचतर्फे पंचगंगा नदीघाटावर मोहिम राबविण्यात आली.
दरवर्षी दिपावलीनंतर शहरातील नागरिक उत्तरपूजेनंतर नैवेद्य व पूजेचे साहित्य फळे फुले नदीत टाकण्याची परंपरा आहे.सदर घटनेमुळे नदीच्या प्रदूषणात वाढ होते.
व याचे परिणाम आजूबाजूच्या गावाना भोगावे लागतात,इनाममार्फत पंचगंगा नदीच्या स्वच्छतेसाठी नेहमीच आवाज उठवला जातो व कृतिशील कार्यही केले जाते.नदीघाट स्वच्छता मोहीम , गणेशोत्सवानंतर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या बाहेर काढून प्रशासनाच्या मदतीने इतरत्र सोय करणे तसेच स्मशानभूमी स्वच्छता असे उपक्रम राबवले जातात. याच अनुशंगाने लक्ष्मीपूजनानंतर केलेल्या आवाहनानुसार इचलकरंजी नागरिक मंचच्या सदस्यांनी सकाळी ८ ते ११ पर्यत नागरिकांना नदीचे महत्व पटवून देऊन पाने,फुले, हार कुंडात तर नैवेद्य गोमातेस देण्यासाठी प्रवृत्त केले. यामध्ये पत्रकार बसवराज कोटगी, उदय निंबाळकर,अमोल मोरे,उमेश पाटील ,अमृत पारीख ,वेंकटेश पाटील , संजय डाके,केतन कोटगी यांनी सहभाग घेतला , त्यांना टिव्ही नाईनचे पत्रकार श्री साईनाथ जाधव यांचे मार्गदर्शन व साथ मिळाली. *प्रशासनाने नेहमीप्रमाणे प्रदूषण करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कारवाई करण्याबाबत सोशल मिडिया वरून प्रसिद्धी केली परंतु पालिका अथवा पोलीस प्रशासनाचे कोणीही नदीपरिसरात फिरकले नाही.
दुपारी नेहमीप्रमाणे नागरिकांनी घाटावर गर्दी केल्याने इचलकरंजी नगरपरिषदेचे स्वच्छता दूत श्री गजानन महाजन गुरुजी एकटेच नदीपात्रातून निर्माल्य बाहेर काढत होते.याबाबत पालिका प्रशासन व शहरातील लोकप्रतिनिधी यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली जात होती.

युवा मराठा न्यूज नेटवर्क

Previous articleस्वर्गीय हिंदूहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृति दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन …
Next articleइचलकरंजी शहरात इ.ना.म.ची नदी वाचवा मोहीम.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here