मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याला हजारोच्या संख्येने उपस्थित रहा -हणमंतराव पाटील वाडेकर.. जाहूर/ मनोज बिरादार युवा मराठा न्युज बिलोली ; सकल मराठा समाज व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड च्या वतीने नांदेड येथे वामनराव पावडे मंगल कार्यालयात दिनांक 8 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 1 वाजता मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.तालुक्यातील सकल मराठा समाजाने या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानी संभाजी बिग्रेड चे जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील वाडेकर यांनी केली आहे. मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारला मराठा आरक्षण स्थगितीचा जाब विचारला जाणार असूनतसेच मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून खा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांची उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आ. नरेंद्र दादा पाटील हेराहणार असूनकार्यक्रमाचे उद्घाटन स्वाभिमानी संभाजी बिग्रेडचे संस्थापक अध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांच्या हस्ते होणार आहे तरी सकल मराठा समाज बांधवांनी या एल्गारमेळाव्याला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन हणमंतराव पाटील वाडेकर यांनी केले आहे.
Home Breaking News मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याला हजारोच्या संख्येने उपस्थित रहा -हणमंतराव पाटील वाडेकर..