Home Breaking News *निमगांव येथे कर्मवीर भाऊसाहेब हिरेंची पुण्यतिथी उत्साहात साजरी*

*निमगांव येथे कर्मवीर भाऊसाहेब हिरेंची पुण्यतिथी उत्साहात साजरी*

184

*निमगांव येथे कर्मवीर भाऊसाहेब हिरेंची पुण्यतिथी उत्साहात साजरी* निमगांव,(विशाल हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-आज दिनांक ०६ नोव्हेंबर २०२० रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय निमगाव येथे संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार, शिक्षण व सहकार महर्षि कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या हस्ते निमगाव गावातील भाऊसाहेब हिरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाविद्यालयाच्या वतीने “कर्मवीरांच्या पाऊलवाटा” या विषयावर वेबीनार चे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी मुख्य वक्ते म्हणून महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा. एस.एल.अहिरे होते. यावेळी बोलतांना प्रा. अहिरे यांनी शेती, शिक्षण आणि सहकार क्षेत्रातील कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या योगदानाची माहिती श्रोत्यांना करून दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांनी कर्मवीरांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची माहिती दिली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.कल्याण कोकणी व महाविद्यालयाचे इतर सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सामाजिक सुरक्षा नियम पाळण्यात आले होते.

Previous articleओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ; राष्ट्रीय अध्यक्ष रविकुमार स्वामी
Next articleमराठा आरक्षण एल्गार मेळाव्याला हजारोच्या संख्येने उपस्थित रहा -हणमंतराव पाटील वाडेकर..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.