मौजे रावणगाव पुनर्वसित खानापूर येथे पाणीपुरवठा फिटर म्हणून कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी. जाहूर,( मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-मुखेड तालुक्यातील मौजे रावणगाव पुनर्वसन खानापूर येथे पाणीपुरवठा फिटर म्हणून काम करीत असलेले श्री रामेश्वर गणपत येरे वा ड हे 1 जानेवारी 2015 पासून पाणी सोडण्याचे अविरत सेवा बजावत असून प्रशासनाने अद्याप पर्यंत मोबदला दिला नाही. प्रशासन यांच्याकडून पगार न देता काम करून घेत आहे पाटबंधारे विभागाकडून त्यांची नेमणूक करण्यात यावी अशा आशयाची रास्त मागणी केलेली आहे. सदरील सेवकाने कोरोनाच्या संकट काळी 8 महिन्याच्या कालावधीत स्वखर्चाने काम पूर्ण केले आहेसंकटकालीन काळात आपल्या जीवाची तमा न बाळगता अहोरात्र मेहनत घेऊनगावकऱ्यांनावेळेवर पाणी पासून सुद्धा प्र प्रशासनाने यांचा यांचा विचार करून सदरील सेवकास न्याय मिळवून द्यावा अशा आशयाचे निवेदन लेंडी प्रकल्प विभाग देगलूर यांच्याकडे दिले आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्यासमोर दिनांक 16 1 2020 रोजी आपल्या समक्ष चर्चाही करण्यात आलेली आहे परंतु आपल्या कार्यालयाकडून अद्याप योग्य निर्णय झालेला नाही मी एक गरीब व्यक्ती असून मी दररोज या कामासाठी पाच ते सहा तास काम करीत आहे त्यामुळे मला इतर दुसरेही काम करता येत नाही प्रशासनाने योग्य तो मोबदला देऊन काय स्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावे. प्रशासनाने माझ्या कामाची योग्य ती दखल घेऊन मला पाणी पुरवठा फिटर म्हणून सेवेत कार्यरत करून घ्यावे अशी विनंती ती रामेश्वर यांच्या कडून करण्यात आलेली आहे.सध्या येथे 60 ते 70 कुटुंब वास्तव्यास आहेत येथे ग्रामपंचायत नसल्यामुळे लेंडी प्रकल्प विभागाकडे कामे सोपविण्यात आलेली आहेत प्रकल्पाची कामे अद्याप पर्यंत पूर्ण झालेले नाहीत
Home Breaking News मौजे रावणगाव पुनर्वसित खानापूर येथे पाणीपुरवठा फिटर म्हणून कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची...