Home Breaking News *मालेगांव पंचायत समितीकडून चौकशी अहवाल देण्यास टाळाटाळ* *आत्मदहनाचा दिला इशारा*

*मालेगांव पंचायत समितीकडून चौकशी अहवाल देण्यास टाळाटाळ* *आत्मदहनाचा दिला इशारा*

127
0

*मालेगांव पंचायत समितीकडून चौकशी अहवाल देण्यास टाळाटाळ*
*आत्मदहनाचा दिला इशारा*
मालेगांव,(युवा मराठा न्युज नेटवर्क)- नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात असलेल्या कौळाणे (निं.) व व-हाणे येथील पत्रकार भवनच्या जागा मागणीबाबत व गावात झालेल्या विकासकामांच्या चौकशीबाबत मालेगांव पंचायत समितीकडून चौकशी अहवाल उपलब्ध करुन देण्यास अक्षम्य हलगर्जीपणा करुन टाळाटाळ केली जात असल्याने दिवाळीनंतर जाहिररित्या पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा युवा मराठाचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांनी आज अप्पर जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
याबाबतची पार्श्वभूमी अशी की,शासनाच्या नियमानुसार कौळाणे (निं.) व व-हाणे या गावी पत्रकार भवनसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात योग्य त्या कागदपत्रांसह संबधित गावच्या ग्रामसेवकाकडे मागणी करुनदेखील त्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष करुन काही तथाकथित गावपुढा-यांना खुश करण्यासाठी अक्षम्य हलगर्जीपणा करुन निष्काळजीपणाने वेळकाढू भुमिका घेतल्यामुळे सदर ग्रामसेवकांच्या चौकशीकामी व गावातील झालेल्या सगळ्याच विकासकामांच्या चौकशीची मागणी करण्याबरोबरच या दोषी ग्रामसेवकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी व त्यांचेवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला जावा म्हणून दिनांक १२आँक्टोबर २०२० रोजी मालेगांव पंचायत समितीसमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला होता.
तर सदरचे उपोषण आंदोलन मागे घ्यावे,असे विनंतीपत्र युवा मराठा न्युजला मालेगांवचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांनी देऊन “तात्काळ चौकशी”उपलब्ध करुन देण्यासोबतच योग्य ती कारवाई करण्याचे लेखी देऊनही गेल्या चोवीस दिवसात चौकशी अहवाल उपलब्ध करुन न देता,मुद्दामच टाळाटाळ करुन दिशाभुल केली जात आहे,त्यामुळे या प्रकरणात संबंधित ग्रामसेवकाना दप्तरात पुन्हा फेरफार करण्याची संधीच पंचायत समितीकडून उपलब्ध करुन दिली जात आहे की काय अशीही शंका निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
दिवाळीपूर्वीच कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.

Previous article*महाविकास आघाडी लढवणार* *पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका*
Next articleपदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर 1 डिसेंबर रोजी मतदान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here