• Home
  • मुखेड येथे माजी राज्यमंत्री मधुकरराव घाटे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पुतळ्यास केले अभिवादन..!

मुखेड येथे माजी राज्यमंत्री मधुकरराव घाटे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पुतळ्यास केले अभिवादन..!

मुखेड येथे माजी राज्यमंत्री मधुकरराव घाटे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पुतळ्यास केले अभिवादन..! जाहूर,( मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-मुखेड. कै. मा. राज्यमंत्री मधुकरराव घाटे साहेबयांच्या २६ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मान्यवरांनी पुतळ्यास अभिवादन केले. दि.१ नोव्हेंबर २०२०रोजी मुखेड शहरातील शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात कै. माजी राज्यमंत्री मधुकरराव घाटेसाहेब यांच्या २६ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कै. माजी राज्यमंत्री मधुकरराव घाटे साहेबयांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मा. आमदार अविनाश रावजी घाटे साहेब मा. आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर मा.जिल्हा परिषद सदस्य बळवंतराव पाटील बेटमोगरेकर मा. जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजीराव मंडगीकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती खुशाल राव पाटील उमरदरी कर काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार मा. जिल्हा परिषद सदस्य जे.टी. भंगारे सर मुखेड नगरपरिषदेचे मा. नगराध्यक्ष गणपतराव गायकवाड डॉ. श्रीरामे डॉ. व्‍यंकटराव भोसले व विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment